
अलीकडे अभिनेता धनुष आणि अभिनेत्री मृणाल या दोघांच्या अफेअरच्या चारच सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. दोघे एकत्र काही कार्यक्रमांमध्ये दिसल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. काही चाहत्यांनी तर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले असून दोघांचं अफेअर सुरु आहे असं म्हटलं आहे.
मृणाल ठाकूरने यावर खुलासा केला असून यावर तिने स्पष्टीकरण दिलं आहे. धनुषसोबत तिचे फक्त चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यात कुठलाही प्रेमसंबंध नाही. ती म्हणाली की, लोकांना गॉसिप करायला आवडते, पण त्यामागे काहीही सत्यता नाही. मृणालने काही सांगितले की, या गोष्टी फार गंभीरपणे घेत नाहीत. मृणालने हेही सांगितले की ती या गंभीरपणे घेत नाही, तर अशा गोष्टींना हलक्याफुलक्या पद्धतीने पाहते.
मृणाल आणि धनुष एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. धनुषने सन ऑफ सरदार २ च्या प्रीमियर शोला हजेरी लावली होती. त्यावेळी दोघांमधील बोलणं झाल्याचं दिसून आलं होत. यावेळी तो अजय देवगणच्या सांगण्यावरून तिथं आला होता असं मृणाल ठाकूरने सांगितलं आहे. त्या दोघांचे चांगले संबंध राहिले असल्यामुळं ते तिथं आल्याचं सांगितलं आहे.
धनुष आणि मृणाल दोघांमधील अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तिने चाहत्यांना आणि माध्यमांना सांगितले आहे की अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नका आणि कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करा. त्यामुळं आता हे स्पष्ट झालं आहे की या दोघांमध्ये फक्त चांगले संबंध असून त्यांच्यात चांगले मैत्रीचे नाते आहे.