दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी असणार आहे. ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' सोबतच 'सनी संस्कारी की तुलसी', 'निक्का जैलदार ४' आणि प्रसाद ओकचा 'वडापाव' हे विविध भाषेतील चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
दसऱ्याच्या दिवशी कांतारा चॅप्टर १ होणार रिलीज, विकेंडला मनोरंजनाचा उडणार धमाका
शुक्रवारी दरवेळी चित्रपट रिलीज होत असतात, आता यावेळी दसऱ्याला चित्रपट रिलीज होणार आहेत. कांतारा चॅप्टर १, सनी संस्कारी की तुलसी कुमारी आणि निक्क जैलदार ४ हा चित्रपट रिलीज होणार आहेत.
25
कांतारा चॅप्टर 1
ऋषभ शेट्टीचा कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट दसऱ्याच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऋषभ शेट्टी यांनीच या चित्रपटाचे लेखन केलं आहे. या सिरीजचा हा दुसरा चित्रपट असून रुख्मिणी वसंत या देखील चित्रपटात असणार आहे.
35
सनी संस्कारी की तुलसी
सनी संस्कारी की तुलसी हा रोमँटिक विनोदी चित्रपट रिलीज होणार आहे. रोहित सराफ (विक्रम) आणि सान्या मल्होत्रा यांच्या लग्नाभोवती हा चित्रपट फिरतो. या चित्रपटात वरून धवन आणि जान्हवी कपूर हे या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
निक्का जैलदार ४ हा चित्रपट आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना विनोदाचे नवीन रूप पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात पंजाबी गायक-अभिनेता अमी विर्क आणि सोनम बाजवा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात मद्यप्रेमी असणारी मुलगी आणि मद्य पसंत नसलेल्या मुलाची गोष्ट दाखविण्यात आली आहे.
55
वडापाव
वडापाव हा मराठी चित्रपट आज रिलीज होणार आहे. हा प्रसाद ओकचा १०० वा चित्रपट आहे. प्रसाद ओक, सविता प्रभुणे, अभिनव बेर्डे, गौरी नलावडे आणि रसिका वेंगुर्लेकर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एक जबरदस्त लव्हस्टोरी प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळेल.