Kantara Chapter 1 : आतापर्यंत 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक दमदार चित्रपट प्रदर्शित झाले. काही चित्रपटांनी बंपर कमाई करत सुपरहिट-ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये स्थान मिळवले. चार चित्रपट असे आहेत ज्यांनी 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
यावर्षी जगभरात बॉक्स ऑफिसवर पाच चित्रपटांनी 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. हे चित्रपट आहेत बॉलिवूडचे 'छावा' आणि 'सैयारा', तमिळ सिनेमातील 'कुली' आणि नुकताच प्रदर्शित झालेला कन्नड चित्रपट 'कांतारा चॅप्टर 1'. आता जाणून घेऊया या पाचही चित्रपटांचे कलेक्शन…
25
4. कांतारा चॅप्टर 1
वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन : 508 कोटी रुपये
हा कन्नड चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषभ शेट्टीने केले असून तोच या चित्रपटाचा मुख्य नायक आहे. त्याच्यासोबत रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया आणि जयराम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. भारतात या चित्रपटाने 360 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाची कमाई अजूनही सुरू आहे.
35
3. कुली
वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन : 518 कोटी रुपये
हा तमिळ चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. या ॲक्शन चित्रपटात रजनीकांत यांची मुख्य भूमिका होती. त्यांच्याशिवाय सौबिन शाहिर, नागार्जुन अक्किनेनी आणि श्रुती हासन हे कलाकारही दिसले. चित्रपटात उपेंद्र आणि आमिर खान यांनी कॅमिओ केला होता. या चित्रपटाचे भारतातील नेट कलेक्शन 285.01 कोटी रुपये होते.
हा रोमँटिक म्युझिकल ड्रामा चित्रपट 18 जुलै 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले होते. अहान पांडे आणि अनीत पड्डा अभिनीत या ब्लॉकबस्टर चित्रपटाची भारतातील नेट कमाई 329.7 कोटी रुपये होती.
55
1. छावा
वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन : 807.91 कोटी रुपये
हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत होता. त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित होता. भारतात या चित्रपटाचे नेट कलेक्शन 601.54 कोटी रुपये होते.