Kajol New Property Rate : बॉलिवूडमधील अभिनेत्री काजोलने मुंबईतील गोरेगाव येथे कोट्यावधी रुपयांची एक प्रॉपर्टी खरेदी केल्याची बातमी समोर आली आहे. 4365 स्क्वेअर फूट वर्गवर विस्तारलेल्या प्रॉपर्टीची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.
Kajol New Retail Space In Mumbai : अजय देवगण याची पत्नी आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री काजोलने मुंबईत एक नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, ही प्रॉपर्टी कमर्शियल कामासाठी वापरली जाणार असल्याचे बोलले जात आहे. प्रॉपर्टी 4365 स्क्वेअर फूट वर्गावर विस्तारली आहे. खरंतर, प्रॉपर्टी एक शॉप प्रमाणे असून जी बंगुर नगर, गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या लिंकिंग रोडवरील भारत रिअॅलिटी वेंचर प्राइव्हेट लिमिडेटच्या इमारतीमध्ये आहे. या प्रॉपर्टीच्या किंमतीच्या केवळ एक स्क्वेअर फूटमध्ये एका सामान्य प्रोफेशनल काम करणाऱ्या व्यक्तीचा पगार येईल.
रिपोर्ट्सनुसार, काजोलने जी प्रॉपर्टी खरेदी केली आहे त्याची किंमत 28.78 कोटी रुपये आहे. असे सांगितले जात आहे की, प्रॉपर्टीसाठी काजोलने 65,940 रुपये प्रति स्क्वेअर फूटनुसार पेमेंट केले आहे. याशिवाय स्टॅम्प ड्युटीसाठी अभिनेत्रीने 1.72 कोटी रुपये भरले आहेत. काजोलच्या प्रॉपर्टीची खासियत अशी की, यासोबत 5 कार पार्किंग करू शकतात.
काजोलने वर्ष 2023 मध्ये देखील एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. यामध्ये एक ऑफिस स्पेस असून रेरा कार्पेट एरिया 194.67 स्क्वेअर फूट आहे. काजोलनेही प्रॉपर्टी 7.64 कोटी रुपयांना खरेदी केली होती. जी अंधेरी पुर्वेला ओशिवरा येथील वीरा देसाई रोडवरील सिग्नेचर नावाच्या इमारतीमध्ये आहे. काजोलने दुसरी प्रॉपर्टी 2023 मध्ये खरेदी केली होती. जे एक अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटसाठी अभिनेत्रीने 16.50 कोटी रुपये दिले होते.
काजोलच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यस वर्ष 2024 मध्य नेटफ्लिक्सवरील 'दो पत्ती' मध्ये झळकली होती. 'मां', 'सरजमीन' आणि 'महारागनी : क्वीन ऑफ क्वीन' मध्ये काजोल दिसणार आहे. मां सिनेमा यंदाच्या वर्षात 27 जूनला प्रदर्शित होणार आहे.