
31 मे 2022 रोजी, प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ (केके) कोलकाता येथील नजरुल रंगमंचावर आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होते. लोक त्याच्या गाण्यांवर नाचत होते, पण पुढच्या क्षणी काय होणार हे कोणालाच कळत नव्हते. केकेला गाताना अनेकदा अस्वस्थ वाटले, पण त्यांनी गाणे सुरूच ठेवले. शेवटी तो स्टेजवरच अचानक बेशुद्ध पडला. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. रंगीबेरंगी संध्याकाळचे अचानक शोकाकुलात रूपांतर झाले. आपल्या गाण्यांनी लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या केकेचा आवाज आता शांत झाला आहे यावर त्याच्या चाहत्यांना विश्वास बसत नव्हता. केकेसारखे गायक क्वचितच जन्माला येतात. केके आता या जगात नसले तरी त्यांचा आवाज आजही तुटलेल्या हृदयांचा, मैत्रीचा आणि प्रेमाचा आवाज म्हणून हवेत तरंगत आहे. खऱ्या अर्थाने ते आजही त्यांच्या गाणांच्यामाध्यमातून जिवंत आहे.
जाहिरातींमध्ये गाण्याने सुरुवात केली :
केके यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्लीतील एका मल्याळी कुटुंबात झाला. केकेचे बालपणी डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. दुसऱ्या वर्गात पहिल्यांदाच गाणे गायले. त्याच्या अष्टपैलुत्वामुळे त्याला लवकरच जाहिरातींमध्ये गाण्याची संधी मिळू लागली. 1994 मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी जाहिरातींसाठी गायला सुरुवात केली. चार वर्षांच्या कालावधीत त्यांनी 11 भारतीय भाषांमध्ये 3,500 जाहिरातींमध्ये गाणी गायली होती.
पहिला अल्बम 1999 मध्ये रिलीज :
सोनी म्युझिक 1999 मध्ये भारतात लॉन्च झाले होते, ते नवीन आवाजाच्या शोधात होते. केकेची प्रतिभा पाहून सोनीने त्याची निवड केली. त्यांनी 'पल' नावाचा एकल अल्बम रिलीज केला, तो अल्बम नुकताच रिलीज झाला आणि प्रत्येक तरुणाच्या ओठावर तो हिट झाला. त्याचा दुसरा अल्बम आठ वर्षांनी २००८ साली रिलीज झाला.
'तडप-तडप के' गाण्याने बॉलिवूडमध्ये एंट्री :
केकेने सलमान खानच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. या गाण्याने केके ला भरपूर प्रसिद्ध मिळाली. हे गाणे त्या काळातील सर्वाधिक ऐकले जाणारे ब्रेकअप गाणे ठरले. या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
या गाण्यांनी केकेला केले अजरामर :
जगाचा निरोप घेतला असला तरी आजही लोकांच्या हृदयात त्यांच्या गाण्यांमधून जिवंत आहेत. 'प्यार के पल', 'यारों', 'लबों को', 'छोड आये हम वो गलियां', 'तडप तडप के', 'सच कह रहा' 'दीवाना' या गाण्यांपैकी काही निवडक गाणी आजही खास स्थान मिळाले आहे. 'बीते लम्हे', 'मेरा पहला-पहला प्यार', 'दिल इबादत' आणि 'तुही मेरी शब है सुभा है'.
आणखी वाचा :
'पंचायत-3' सीरिजमध्ये दडलंय 'मिर्झापुर' च्या पुढील सीझनचे मोठे अपडेट, अली फजल म्हणतो...