Indian 2 Movie Twitter Review : कमल हसन यांचा सिनेमा 'हिंदुस्तान' ची बॉक्स ऑफिसवर रंगत फिकी, युजर्स म्हणाले...

Published : Jul 12, 2024, 02:28 PM ISTUpdated : Jul 12, 2024, 03:03 PM IST
Indian 2

सार

Indian 2 Twitter Review : कमल हसन यांचा नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेला इंडियन-2 सिनेमाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावरील युजर्सचे सिनेमाबद्दलचे काय मत आहे हे जाणून घेऊया...

Indian 2 Twitter Review : कमल हसन यांचा इंडियन-2 सिनेमा सिनेमागृहांमध्ये 12 जुलैला प्रदर्शित झाला आहे. एस. शंकर यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमाची कथा वर्ष 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या इंडियन (हिंदी भाषेत- हिंदुस्तानी नावाने प्रदर्शित) सिनेमाचा सिक्वल आहे. प्रेक्षकांच्या मनात अद्याप सेनापतिची भूमिका आठवणीत आहे. याच सिनेमातही सेनापतिची भूमिका तशीच ठेवण्यात आली असून कमल हसन यांनी त्याला योग्य न्याय देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. इंडियन-2 सिनेमाची सुरुवात दमदार आहे. पण सिनेमातील नंतरचे काही सीन्समुळे प्रेक्षक कंटाळले आहेत.

सिनेमात काय खटकले?
इंडियन सिनेमा तमिळ, तेलुगु आणि हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमासंदर्भात प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. सिनेमाला संमीश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सेनापतिच्या भूमिकेतील कलम हसन यांचे प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे. पण कथेबद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये जुन्या सिनेमाप्रमाणेच असून त्यात काही फारसे बदल करण्यात आलेले नाही. यामुळे तरुण वर्गाला सिनेमा कंटाळवाणा वाटला आहे. सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर युजर्सने काय प्रतिक्रिया दिल्यात हे पाहूया....

सोशल मीडियावरील युजर्सच्या प्रतिक्रिया
एका युजरने लिहिले की, “इंडियन-2 सिनेमा जुना आणि कंटाळवाणा आहे. सिनेमातील दिग्दर्शकांनी एकदम कंटाळवाणा केला आहे. यामध्ये कोणतीही उत्सुकता दिसून येत नाहीये. सर्वकाही आर्टिफिशिअल दिसून येत आहे. सिनेमा एखाद्या नाटकाप्रमाणे असल्यासारखा वाटतोय.”

दुसऱ्याने लिहिले की, “हा जुनाट पद्धतीचा सिनेमा आहे. यामध्ये कोणतीही क्रिएटिव्हिटी दिसून येत नाहीये. मेकअप आणि संवादही प्रेक्षकांना आवडलेला नाही. काही सीन कमल हसन यांच्यामुळे दमदार झाले आहेत. याशिवाय सिनेमातील क्लायमेक्सही प्रेक्षकांना आवडलेला नाही.”

तिसऱ्याने लिहिले की, “आउटडेटेड सिनेमा आहे.”

कमल हसनच्या चाहत्यांना आवडला सिनेमा
अन्य एका युजरने लिहिले की, “विंटेज शंकर सर फॉर्ममध्ये परतले आहेत. सिनेमाचे एडिटिंगही उत्तम आहे. गेल्या काही वर्षांमधील सर्वाधिक दमदार सिनेमा होऊ शकतो.”

 

आणखी वाचा : 

Indian 2 Vs Sarfira सिनेमाच्या अ‍ॅडवान्स बुकिंगमध्ये टक्कर, वाचा कमाई

Amitabh Bachchan यांचा डीपफेक व्हिडीओ तयार करणे पडले महागात, कोर्टाने फेटाळला आरोपीचा अंतरिम जामीन

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Ramayana: ४ हजार कोटींच्या 'रामायण'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये हवा! रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर धमाका
Jailer 3: रजनीकांतचा स्वॅग, बालय्या आणि विजय सेतुपतीची एन्ट्री; 'जेलर 3' चा मेगा प्लॅन ठरला?