आधीच प्रदर्शित झालेले स्वातंत्र्यदिन विशेष
तेहरान (ZEE5) – जॉन अब्राहम, मानुषी छिल्लर, हादी खंजानपूर, माधुरीमा तुळी आणि अॅडम कार्स्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा अॅक्शन थ्रिलर आंतरराष्ट्रीय संघर्षांवर आधारित आहे.
सारे जहां से अच्छा (Netflix) – प्रतीक गांधी, कुणाल ठाकूर, अनूप सिंग, अमित झा, कृतिका कामरा, रजत कपूर आणि तिलोत्तमा शोम यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा थ्रिलर आहे.
अंधेरा (Amazon Prime Video) – वत्सल शेठ, सुरवीन चावला, प्रणय पचौरी, प्रिया बापट आणि प्राजक्ता कोळी यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही अलौकिक वेबसीरिज आहे.
कोर्ट कचहरी (Sony LIV) – आशिष वर्मा, पवन मल्होत्रा, पुनीत बत्रा, आनंदेश्वर द्विवेदी, प्रियांशा भारद्वाज आणि सुमाली खानिवाले यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही कायदेशीर नाट्यमालिका आहे.
कायदेशीर लढाया, सस्पेन्स थ्रिलर ते अलौकिक थरार अशा विविध प्रकारच्या कथांसह, हा स्वातंत्र्यदिन प्रेक्षकांना घरी बसून भरपूर मनोरंजनाचा आनंद घेण्याची संधी देत आहे.