
प्रसिद्ध कॉमेडियन तन्मय भटबद्दल चर्चा सुरु झाली आहे. एका अहवालातून त्याची संपत्ती सांगण्यात आली आहे. सर्वाधिक पैसे कमावणाऱ्या युट्युबरच्या यादीमध्ये त्याचा समावेश झाला आहे. हा अहवाल आल्यापासून तन्मय माध्यमांमध्ये झळकताना दिसून येत आहे. याबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं यावेळी आपल्या कमाईबाबत वक्तव्य केलं आहे.
तन्मय भटकडे ६६५ कोटींची एकूण संपत्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याला सर्वात श्रीमंत युट्युबर असं म्हणण्यात आलं आहे. यावर कमेंट करताना तन्मयने म्हटलं आहे की, माझ्याकडे एवढे पैसे जर असते तर मी मेंबरशिप विकली नसती. यावर युझरने तन्मयची खिल्ली उडवली आहे. त्यांनी केलेल्या कमेंट वाचून आपल्याला नक्कीच हसायला येईल.
एक युझर म्हणाला की, माझ्या तोंडावर १०-२० कोटी फेकून मार नाहीतर तुझ्यावर रेड पडेल. तर दुसऱ्या युझरने म्हटलं की, तन्मय हा युट्युबचा करण जोहर बनत आहे. तन्मयच्या व्यतिरिक्त समय रैना आणि कॅरी मिनाटी यांनी चांगली कमाई केली आहे. आज तन्मय हा इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी व्यक्तींपैकी एक बनला आहे. त्यानं स्वतःच्या बळावर त्यानं स्थान निर्माण केलं आहे.