
अभिनेते सचिन पिळगावकर हे कायमच चर्चेत येत असतात. त्यांना अनेकदा प्रेक्षकांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अशातच आता ते एका कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि त्यावरून ते परत चर्चेत आले आहेत. त्यांच्यासोबत यावेळी शेखर सुमन आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानावरून ते चर्चेत आले आहेत.
यावेळी बोलताना सचिन पिळगावकर यांनी म्हटलं आहे की, माझी मातृभाषा मराठी असली तरीही मी उर्दू भाषेत विचार करतो. यावेळी ते काय म्हणाले आपण जाणून घेणार आहोत. मला माझ्या बायकोने किंवा कोणीही मला उठवलं तरी उर्दू भाषेत बोलत असतो. मी केवळ उर्दूतून जागा होत नाही तर मी उर्दूसोबत झोपतोही. माझं उर्दू भाषेवरील प्रेम माझ्या बायकोला आवडत.
सचिन पिळगावकर हे अनेक वर्षांपासून मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत काम करत आहे. अलीकडच्या काही काळामध्ये त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी स्थान मिळवलं आहे. नवरा माझा नवसाचा, सिटी ऑफ ड्रीम्स यांसारख्या सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये त्यांनी काम केलं आहे. करिअरच्या सुरुवातीला शोले, नलिका वधू, नदीया के पार यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.