हिना खानवर झाली शस्रक्रिया, रुग्णालयातील फोटो शेअर करत दिले हेल्थ अपडेट्स

Published : Jul 17, 2024, 01:56 PM ISTUpdated : Jul 17, 2024, 02:56 PM IST
Hina Khan Cancer

सार

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सध्या कॅन्सरची झुंज देत आहे. अभिनेत्री सातत्याने आपल्या चाहत्यांसोबत तिच्या आरोग्यासंबंधित अपडेट्सही शेअर करत असते. नुकतीच हिना खानवर शस्रक्रिया झाली असून यासंदर्भातील एक पोस्ट तिने शेअर केली आहे.

Hina Khan Health Update : हिना खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात सध्या हिनावर उपचार सुरु आहेत. कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजचा सामना करत असलेल्या हिनाला आजारापणाचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दलचा अनुभव हिनाने नुकताच शेअर केला होता. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून घरोघरी पोहोचलेली हिना खानने तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. यामुळे चाहत्यांसह अनेकांना धक्का बसला होता. सातत्याने हिनाची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. या प्रवासात हिना खान तिच्या वडीलांना खूप मिस करतेय.

हिना खानवर कीमोथेरपी सुरु झाली आहे. पण सातत्याने भयंकर दुखण्याचा त्रास तिला सहन करावा लागत आहे. सोशल मीडियावर हिना आपल्या हेल्थबद्दल सतत अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते.

आजाराचा त्रास होतोय
प्रेक्षकांमध्ये अक्षरा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या हिनाला कॅन्सर झाल्यापासून सतत त्रास होतोय. नुकत्याच इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये त्रासातही चेहऱ्यावर हसू ठेवायचे असा मेसेज लिहिला होता. व्यक्ती मी ठिक आहे म्हणत असलो तरीही तो त्रासात असतोच असेही पोस्टमध्ये लिहण्यात आले होते.सोशल मीडियाच्या माध्यमातून हेल्थ अपडेट
हिना खानने इंस्टाग्रामवरील स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. यामध्ये लिहिले होते की, अजून एक दिवस, प्रार्थना करा. हिना खानचा रुग्णालयातील बेडवरचा तो फोटो होतो. हिना खान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आपल्या आरोग्य, उपचाराची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहे.

वडिलांना मिस करतेय हिना खान
हिना खानने याआधी आपल्या वडिलांसोहत एक कोलाज फोटो शेअर केला होता. यामध्ये लिहिले होते की, मिस यू. अभिनेत्री आपल्या वडिलांना तिच्या सध्याच्या स्थितीत वेळोवेळी मिस करत आहे.

आणखी वाचा : 

हिना खान कामावर परतली, इंस्टाग्रामवर Video शेअर करत कॅन्सरशी लढणाऱ्यांना दिला महत्वाचा सल्ला

Sonakshi Sinha ची पतीसोबतच्या रोमँटिक फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Jailer 3: रजनीकांतचा स्वॅग, बालय्या आणि विजय सेतुपतीची एन्ट्री; 'जेलर 3' चा मेगा प्लॅन ठरला?
Ranabaali Box Office: 'रणबाली'ची तिकीट खिडकीवर हवा! आतापर्यंत विकली गेली २० लाखांहून अधिक तिकिटे