'हरी हर वीरा मल्लू'चा हिंदी टीझर रिलीज, बॉबी देओलची पुन्हा एकदा निगेटिव्ह भूमिका

बॉबी देओल आणि पवन कल्याण यांच्या 'हरी हर वीरा मल्लू' या चित्रपटाचा हिंदी टीझर रिलीज झाला आहे. यात पुन्हा एकदा बॉबी देओल निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.पहा आणि जाणून घ्या कसा आहे ट्रेलर.

भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि सर्वाधिक मागणी असलेल्या स्टार्सपैकी एक असलेल्या पवन कल्याणने त्याच्या शानदार कारकिर्दीत प्रथमच पीरियड ॲक्शन ॲडव्हेंचर, हरी हरा वीरा मल्लू या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्माता एएम रत्नम त्यांच्या प्रतिष्ठित मेगा सूर्या प्रॉडक्शनने चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा 17व्या शतकातील एका व्यक्तीची आहे जो शोषणाविरोधात आवाज उठवतो. चित्रपटाचे चित्रीकरण मोठ्या बजेटमध्ये करण्यात आले असून त्याच्या शूटिंगसाठी चारमिनार, लाल किल्ला आणि मछलीपट्टणम बंदर यांसारखे मोठे सेट तयार करण्यात आले होते. हरी हर वीरा मल्लूचा हिंदी टीझर आज रिलीज झाला आहे. 'हरी हर वीरा मल्लू: सवोर्ड वर्सेस स्पिरिट' असे या टीझरचे नाव आहे. या चित्रपटात पवन कल्याणशिवाय बॉबी देओल दिल्लीच्या सुलतानच्या भूमिकेत दिसणार आहे.

टीझरमध्ये, निर्माते पवन कल्याण उर्फ ​​हरी हरा वीरा मल्लूच्या व्यक्तिरेखाचे ​​वर्णन 'एकटा योद्धा' म्हणून करतात जो गरीब आणि शोषितांसाठी अशा देशात 'न्यायासाठी युद्ध लढतो'. चित्रपटातील संगीत एमएम कीरावानी यांचे आहे. मुघल सम्राटाच्या भूमिकेत बॉबी देओल आणि गरीब आणि शोषितांचा नायक म्हणून पवन कल्याण आहे. दोन्ही स्टार्सची देहबोली आणि त्यांच्यासाठी डिझाइन केलेला लूक अप्रतिम आहे.

दिग्दर्शक क्रिश जगरलामुडी यांनी यापूर्वीच कांचे, गौतमीपुत्र सातकर्णी आणि मणिकर्णिका यांसारखे संस्मरणीय ब्लॉकबस्टर दिले आहेत, ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जुलूम करणाऱ्यांविरुद्ध लढलेल्या वीरांचे चित्रण केले आहे. या चित्रपटात पवन कल्याणसह निधी अग्रवाल, बॉबी देओल, सुनील, नोरा फतेही आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 2024 च्या अखेरीस प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे.

Share this article