छातीत दुखल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पटकन केलं दाखल, प्रसिद्ध अभिनेता यशवंत सरदेशपांडे यांनी घेतला अखेरचा श्वास

Published : Sep 30, 2025, 11:26 AM IST
Yashwant Sardeshpande

सार

प्रसिद्ध मराठी आणि कन्नड कलाकार, चित्रपट निर्माते यशवंत सरदेशपांडे यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 'ऑल द बेस्ट' या नाटकामुळे प्रसिद्धी मिळवलेल्या सरदेशपांडे यांनी अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात मोठे योगदान दिले. 

मराठी रंगभूमीवरचे प्रसिद्ध कलाकार आणि चित्रपट निर्माते यशवंत सरदेशपांडे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच निधन झालं आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी मालती सरदेशपांडे या आहेत. त्यांच्या पत्नी मनोरंजन सृष्टीत काम करत असून त्यांचं मोठं काम आहे. निर्माते यशवंत यांचं कन्नड मनोरंजनसृष्टीत मोठं योगदान दिल आहे.

बेशुद्ध झाल्यानंतर दवाखान्यात केलं दाखल 

यशवंत सरदेशपांडे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छातीत दुखू लागल्यामुळे यशवंत यांना पटकन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या वतीने पूर्ण प्रयत्न करण्यात आले पण ते शुद्धीवर आले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला.

निधनामुळे चित्रपट सृष्टीला बसला धक्का

यशवंत सरदेशपांडे यांच्या मृत्यूमुळे चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. रविवारी धरवडमध्ये यशवंत यांनी नाटक सादर केले होते. सोमवारी बंगळूरमध्ये आल्यानंतर त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण त्यांचा उपचार पूर्ण होण्याआधीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

ऑल द बेस्ट नाटकानं दिली प्रसिद्धी 

ऑल द बेस्ट या नाटकानं यशवंत यांना खरी ओळख मिळून दिली. त्यांनी भारतातील अनेक नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन केलं होत. त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये ओळख तयार झाली होती. अभिनय आणि दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले यशवंत सरदेशपांडे यांना 'ऑल द बेस्ट' या नाटकानं प्रसिद्धी मिळाली. त्यांनी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्येही काम केलंय.

जीवनपरिचय जाणून घ्या 

यशवंत सरदेशपांडे यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील बसवाना बागेवाडी तालुक्यातील उक्कली गावात झाला होता. त्यांनी लहान वयातच अभिनयाला सुरुवात केली. यशवंत यांना नागेया सरदार या नावाने ओळखलं जात होतं. हेग्गोडू येथील प्रसिद्ध निनासम थिएटर स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि नाट्यशास्त्रात डिप्लोमा मिळवला. त्यानंतर त्यांनी 1996 मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठातून सिनेमा आणि नाट्यलेखनाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Great Indian Kapil Show 4 : कपिल शर्मा ते सुनील ग्रोव्हर, स्टार्सची फी वाचून डोळे होतील पांढरे!
हृतिकसोबत डान्सनंतर सुझानची मुलांसाठी भावनिक पोस्ट, दोघेही गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसह लग्नात सहभागी!