Entertainment: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची मुलगी 'दुआ' सध्या दोन्ही आजी-आजोबांच्या देखरेखीखाली मोठी होत आहे. दीपिकाचे वडील आणि माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी त्यांची नात दुआ बंगळूरला आल्यावर काय करते, याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची मुलगी दुआ आता दोन वर्षांची होत आहे. तिचा जन्म 8 सप्टेंबर 2024 रोजी झाला. 'द इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत, तिचे आजोबा प्रकाश पदुकोण यांनी नातीच्या स्वभावाबद्दल आणि तिच्या गमतीजमतींबद्दल सांगितलं.
25
मेट्रोमध्ये फेरफटका
दीपिकाची मुलगी दुआ आजोळी, म्हणजेच बंगळूरला आली की मेट्रो आणि रिक्षाने फिरते. ती पार्कमध्येही मनसोक्त फिरण्याचा आनंद घेते. 'नातवंडं आल्यावर काय होतं हे मला माहीत नव्हतं, पण आता मी दुआसोबत वेळ घालवणं एन्जॉय करतोय,' असं प्रकाश पदुकोण यांनी सांगितलं.
35
दुआचा स्वभाव
दुआ खूप मनमिळाऊ आहे. ती प्रत्येकाशी बोलते आणि कोणालाही पाहिलं की 'हाय' म्हणते. तिला बंगळूरला आल्यावर घराजवळच्या पेडल पार्कमध्ये जायला आवडतं. तिला ट्रेन बघायलाही खूप आवडतं. लहानपणापासून प्रवास केल्यामुळे तिच्या वाढीला मदत झाली आहे, असं पदुकोण म्हणाले.
रणवीर आणि दीपिका दोघेही दुआची काळजी घेतात, पण दीपिका थोडी जास्तच. जेव्हा रणवीर शूटिंग करत नसतो, तेव्हा तो दुआसोबत जास्त वेळ घालवतो. बाळाची काळजी घेण्यासाठी दोन्ही कुटुंबं आहेत. 'आजोबा झाल्यावर इतका बदल होईल असं वाटलं नव्हतं,' असंही पदुकोण म्हणाले.
55
दुसऱ्या बाळाच्या प्रतीक्षेत दीपिका
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच दीपिकाने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. तिने मुलगी दुआ प्रेग्नन्सी किट हातात धरलेला एक गोड फोटो शेअर केला होता.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.