Entertainment: बॉलिवूडमध्ये रणवीर सिंगला अचानक का टार्गेट केलं जातंय? या प्रश्नावर कंगना रणौतने आधी उत्तर टाळलं, पण नंतर तिने जे उत्तर दिलं, त्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
मुंबई: बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौत आणि वाद हे जणू समीकरणच आहे. आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने थेट रणवीर सिंग आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या मानसिकतेवरच बोट ठेवलं आहे.
27
रणवीर सिंगला इंडस्ट्रीत का टार्गेट केलं जात आहे?
सध्या कंगना रणौत तिच्या 'भारत भाग्य विधाता' (Bharat Bhhagya Viddhaata) या नव्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशनवेळी एका मुलाखतीत तिला, 'रणवीर सिंगला इंडस्ट्रीत का टार्गेट केलं जात आहे?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर कंगनाने दिलेलं उत्तर आता व्हायरल झालंय.
37
रणवीर सिंगला अचानक का टार्गेट केलं जातंय?
मुलाखतीत, 'रणवीर सिंगला अचानक का टार्गेट केलं जातंय?' असं विचारल्यावर कंगनाने आधी, 'हे तुम्ही त्यालाच विचारायला हवं, मला काय माहीत?' असं म्हणत उत्तर टाळलं. पण, पूर्वी तिलाही अशाच टार्गेटिंगचा सामना करावा लागल्याने तिचं मत विचारल्यावर तिने बॉलिवूडच्या आतल्या गोष्टींवर भाष्य केलं.
कंगना म्हणाली, 'मी इतकंच सांगेन की या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाकिस्तानवर जरा जास्तच प्रेम आहे (Inme thoda Pakistan prem hai). आतापर्यंत आलेले बहुतेक सिनेमे आपल्याला पाकिस्तानबद्दल सहानुभूती दाखवायला किंवा त्यांचं कौतुक करायला शिकवतात. इतकी वर्षं ते हेच करत आले आहेत,' असा गंभीर आरोप कंगनाने केला आहे.
57
धुरंधरचे यश
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' (Dhurandhar) सिनेमाचा उल्लेख झाल्यावर कंगनाने आपला मुद्दा अधिक स्पष्ट केला. ती म्हणाली, 'हो, जेव्हा एखादा सिनेमा पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणतो, तेव्हा इथल्या काही लोकांना त्रास होतो. आम्ही इतकी वर्षं जे पसरवलं, त्याला काहीच किंमत राहिली नाही, असं दुःख त्यांना होतं. याच कारणामुळे टार्गेटिंग सुरू आहे,' असं विश्लेषण तिने केलं.
67
'भारत भाग्य विधाता'
कंगनाचा 'भारत भाग्य विधाता' हा सिनेमा मनोज तपाडिया यांनी दिग्दर्शित केला आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी कामा हॉस्पिटलमधील (Cama Hospital) सुमारे 400 रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या नर्सच्या शौर्याची ही कथा आहे. सिनेमात कंगनासोबत गिरिजा ओक, स्मिता तांबे आणि ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट आज, म्हणजेच 12 जून 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
77
नव्या वादाची ठिणगी
एकंदरीत, कंगनाच्या या 'पाकिस्तान प्रेम' वक्तव्याने बॉलिवूडमध्ये नव्या वादाची ठिणगी पडली आहे. आता सोशल मीडियावर रणवीर सिंगचे चाहते आणि कंगनाचे चाहते यांच्यात एक मोठं युद्धच सुरू झालं आहे.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.