Aishwarya Rai च्या हाताला दुखापत तरीही स्टाइलने वाढवली रंगत, Cannes मधील अभिनेत्रीच्या लुकवर चाहते फिदा

Published : May 17, 2024, 07:31 AM ISTUpdated : May 17, 2024, 07:39 AM IST
Cannes 2024 Aishwarya Rai Look

सार

Cannes 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील अभिनेत्री ऐश्वर्या रायचा पहिला लुक समोर आला आहे. हाताला दुखापत झाली असली तरीही अभिनेत्रीच्या लुकने सर्वांचे लक्ष डिझाइनर गाउनने वेधले.

Aishwarya Rai Cannes 2024 Look : बॉलिवूडमधील अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे कौतुक कितीही केले तरीही कमीच आहे. ऐश्वर्या राय आपल्या लुक आणि अदांमुळे नेहमीच लाइमलाइटमध्ये राहते. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याच्या लुकने सर्वांना भूरळ पाडल्याचे दिसून आले. हाताला दुखापत झाली असली तरीही अभिनेत्रीच्या लुकने रेड कार्पेटची शान वाढवली.

77व्या कान्स फिल्म फेस्टिवलमधील ऐश्वर्याचा लुक
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अभिनेत्री ऐश्वर्या रायचा स्टनिंग लुक दिसत होता. यावेळी ऐश्वर्याने काळ्या, पांढऱ्या आणि गोल्डन रंगाच्या कॉम्बिनेशनमधील गाउन परिधान केला होता. या गाउनला लांब ट्रेलही होती. त्यावर गोल्डन रंगातील फुलांची डिझाइन होती. याशिवाय कानात गोल्डन रंगातील मोठ्या आकाराचे कानातले घातले होते. अभिनेत्रीचा मेकअप सॉफ्ट ठेवण्यात आला होता.

चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील अभिनेत्री ऐश्वर्या रायचा लुक पाहून चाहते फिदा झाले आहेत. चाहत्यांकडून ऐश्वर्याच्या लुकचे कौतुक केले जात आहे. काहींनी म्हटले की, ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली असली तरीही कान्सच्या रेड कार्पेटवरील तिचा लुकने सोहळ्याची शान वाढवली आहे.

दरम्यान, ऐश्वर्या राय बुधवारी (15 मे) कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी फ्रेंच रिवेरासाठी रवाना झाली होती. यावेळी ऐश्वर्यासोबत मुलगी आराध्यालाही मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते. प्रत्येक कान्स फेस्टिव्हलमधील लुकप्रमाणे यंदाच्याही ऐश्वर्याच्या लुकची जोरदार चर्चा सुरु झालीय.

या व्यक्तींनीही लावली उपस्थिती
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आतापर्यंत 'शार्क टँक' च्या जज नमिता थापर, ओपनिंग सेरेमनीवेळी उर्वशी रौतेला आणि 'तारक मेहता' मालिकेतील कलाकार दीप्ति साधवानी यांनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. याशिवाय आरजे करिश्मासारखे चेहरेही रेड कार्पेटवर झळकणार आहेत.

आणखी वाचा : 

उर्वशी रौतेलाने दीपिकाचा लुक केला कॉपी, Cannes मधील फोटो व्हायरल

राखी सावंतच्या हेल्थबद्दल एक्स-पती रितेशने दिली मोठी अपडेट, म्हणाला...

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!