Karisma Kapoor: पोटच्या मुलाचा आणि मुलीचा पत्ता चुकीचा लिहिला, बाप संजय कपूरने मुलांना वाळीत का टाकलं?

Published : Oct 14, 2025, 10:16 AM IST

Karisma Kapoor: अभिनेत्री करिष्मा कपूरने तिचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संजय कपूर यांचे मृत्युपत्र बनावट असून मुलांना वारसा हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी ते तयार आहे.

PREV
16
Karisma Kapoor: पोटच्या मुलाचा आणि मुलीचा पत्ता चुकीचा लिहिला, बाप संजय कपूरने मुलांना वाळीत का टाकलं?

अभिनेत्री करिष्मा कपूरचा नवरा संजय कपूरच्या संपत्तीचा वाद सुरु आहे. त्याची जवळपास ३०,००० कोटींची संपत्ती असून त्याचा दिल्ली उच्च न्यायालयात वाद सुरु आहे. दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली.

26
अभिनेत्री करिष्मा कपूरने दाखल केली होती याचिका

अभिनेत्री करिष्मा कपूरने याचिका दाखल केली होती. करिष्माची 20 वर्षीय मुलगी समायरा आणि 15 वर्षीय मुलगा कियान यांचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी दावा केला की संजय कपूर यांचे मृत्युपत्र त्यांच्या पहिल्या लग्नापासून त्यांच्या मुलांना वारसाहक्काने हिरावून घेण्यासाठी बनावट करण्यात आले होते.

36
वकील जेठमलानी काय म्हणाले?

वकील जेठमलानी यांनी म्हटलं आहे की, संजय कपूरचा या मृत्युपत्राशी काहीही संबंध नाही आणि आम्हाला कोणतेही कागदपत्रे देण्यात आले नाही. त्यांनी मृत्युपत्रात त्यांच्या मुलीचा आणि मुलाचा पत्ता चुकीचा लिहिला आहे.

46
पोटच्या मुलांबाबत संजय कपूर असं करूच शकत नाही

पोटच्या मुलांबाबत संजय कपूर असं करूच शकत नाही असं वकील जेठमलानी यांनी म्हटलं आहे. पुढं बोलताना त्यांनी म्हटलं की, संजय कपूरची तब्येत चांगली होती आणि त्यांनी एका मजबूत ट्रस्टकडे मालमत्तेचे संरक्षण करायला दिले होते.

56
परिस्थितीजन्य पुरावे एकदम विरोधाभासी

परिस्थितीजन्य पुरावे इतके विरोधाभासी आहेत की मृत्युपत्रातील मजकूर खोटा आहे असा निष्कर्ष काढणे पूर्णपणे शक्य आहे. मी त्यांच्या मुलांशी केलेल्या फोन संभाषणांवरून हे विधान करत आहे." असं वकील जेठमलानी यांनी म्हटलं आहे.

66
मुलांचा पत्ता कोणता बाप चुकीचा लिहिलं

संजय कपूरचे त्यांच्या मुलांशी खूप चांगले संबंध होते. मग त्यांनी त्यांच्या मुलाचा आणि मुलीचा पत्ता ते कसे चुकीचे लिहू शकतात? हे लक्षात घ्यायला पाहिजे की, समायरा आणि कियान हे संजय कपूर यांच्या करिश्मा कपूरशी झालेल्या लग्नापासून झालेली मुले आहेत.

Read more Photos on

Recommended Stories