Manish Malhotras Diwali Party : मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीने उत्सवाला सुरुवात झाली. हेमा मालिनी, मलायका अरोरा, गौरी खान आणि सोनाक्षी सिन्हा यांसारख्या बॉलिवूड स्टार्सनी त्यांच्या जबरदस्त फॅशन आणि फेस्टिव्ह अंदाजाने सर्वांची मनं जिंकली.
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सारा अली खान आणि करीना कपूर सुंदर ड्रेसमध्ये दिसल्या. काजोलनेही आपल्या मुलीसोबत पार्टीचा आनंद लुटला आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
210
रेखा आणि गौरी खानचा जबरदस्त लूक
रेखाने मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत नववधूप्रमाणे कांजीवरम साडी आणि भरजरी दागिन्यांमध्ये एंट्री केली. गौरी खान गडद लाल रंगाच्या शिमरी साडीत खूपच सुंदर दिसत होती.
310
दिवाळी पार्टीत मलायका अरोरा आणि सोनाक्षी सिन्हा
मलायका अरोराने मेटॅलिक स्टार्स असलेल्या स्किन कलरच्या गाऊनमध्ये सर्वांना आश्चर्यचकित केले. सोनाक्षी सिन्हा पती झहीर इक्बालसोबत सुंदर पोज देताना दिसली.
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत ईशान खट्टर क्रीम रंगाच्या चुडीदार कुर्ता-पायजमामध्ये दिसला, तर अर्जुन कपूर ऑल-ब्लॅक आऊटफिटमध्ये एकदम डॅशिंग दिसत होता.
510
आयुष्मान खुरानाचे फॅमिलीसोबतचे क्षण
आयुष्मान खुराना पत्नी आणि लहान भावासोबत मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत पोहोचला. तिघांनी मिळून फोटोग्राफर्सना आनंदाने पोज दिली.
610
शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस अंदाज
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत शिल्पा शेट्टीचा जलवा पाहायला मिळाला. ती इंडो-वेस्टर्न ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. सिद्धार्थ मल्होत्रा देखील पारंपरिक पोशाखात दिसला.
710
करण जोहर आणि टायगर श्रॉफचा स्टायलिश लूक
करण जोहर आणि टायगर श्रॉफ देखील मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत दिसले. दोघांनीही पारंपरिक लूक केला होता. करणने सोनेरी वर्क असलेला काळा कुर्ता घातला होता.
810
ड्रिम गर्ल हेमा मालिनी यांचा मनमोहक अंदाज
रितेश देशमुख मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत पत्नीसोबत पोज देताना दिसला. 'ड्रिम गर्ल' हेमा मालिनी देखील या कार्यक्रमात उपस्थित होत्या.
910
नीलम कोठारी पतीसोबत पार्टीत
माजी अभिनेत्री नीलम कोठारी पती समीर सोनीसोबत मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत पोहोचली. सान्या मल्होत्रा देखील स्टायलिश लूकमध्ये दिसली.
1010
वाणी कपूर आणि उर्मिला मातोंडकरचा ग्लॅमरस लूक
मनीष मल्होत्राच्या पार्टीत वाणी कपूर ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. उर्मिला मातोंडकर देखील सिल्व्हर शिमरी ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती.