Hrithik Roshan vs Jr NTR : जाणून घ्या दोघांच्या टॉप ५ चित्रपटांची कमाई, कोण ठरतोय वरचढ?

Published : Jul 25, 2025, 11:41 AM IST

मुंबई : 'वॉर २' चित्रपटामुळे ऋतिक रोशन आणि Jr NTR चर्चेत आले आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वांनाच उत्सुकता आहे. दोघांच्याही टॉप ५ हिट चित्रपटांची ही यादी.

PREV
17
ऋतिक रोशनचे चित्रपट

ऋतिक रोशन याने त्याच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. २००० मध्ये 'कहो ना प्यार है' या ब्लॉकबस्टर चित्रपटातून त्याने पदार्पण केले. त्यानंतर त्याला सतत हिट चित्रपट मिळत गेले.

27
ऋतिक रोशनचे टॉप ५ हिट चित्रपट

ऋतिक रोशन याच्या टॉप ५ हिट चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर - वॉर - (४७५.६२ कोटी), कृष ३ - (३९३ कोटी), बँग बँग - (३३२.४३ कोटी), फाइटर - (३४४.४६ कोटी), सुपर ३० - (२०८.९३ कोटी). या चित्रपटांनी त्याला बॉक्स ऑफिसवर हिट केले.

37
Jr. NTR चे चित्रपट

साउथ सुपरस्टार ज्युनियर NTR च्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, त्याने २००१ मध्ये 'निन्नू चूडलानी' या चित्रपटातून पदार्पण केले. त्याचा पदार्पणाचा चित्रपट हिट झाला नाही. मात्र, त्याच वर्षी आलेला त्याचा 'स्टुडंट नंबर १' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

47
Jr NTR चे टॉप ५ हिट चित्रपट

Jr NTR च्या टॉप ५ चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर - RRR - (१३०० कोटी), जंथा गॅरेज - (१३५ कोटी), अरविंद समेथा वीरा राघव - (१७९.६ कोटी), जय लव कुश - (१३० कोटी), टेम्पर - (७४.३ कोटी). त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ज्युनिअर एनटीआरही ऋतीकला चांगली टक्कर देतो.

57
ऋतिक रोशन vs Jr NTR

ऋतिक रोशन किंवा ज्युनियर NTR, यांच्या टॉप ५ चित्रपटांनी जास्त कमाई केली ते पाहूया. ऋतिकच्या चित्रपटांनी १७५४.४४ कोटींची कमाई केली. तर ज्युनियर NTR च्या टॉप ५ चित्रपटांनी १८१८.९ कोटींची कमाई केली आहे.

67
ऋतिक-Jr NTR चा 'वॉर २' चित्रपट

यशराज फिल्म्सच्या 'वॉर २' या स्पाय युनिव्हर्स चित्रपटात ऋतिक रोशन आणि ज्युनियर NTR मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्री आहे. त्यांच्याशिवाय आशुतोष राणा आणि अनिल कपूरही चित्रपटात दिसणार आहेत.

77
'वॉर २' चित्रपटाचे बजेट

निर्माता आदित्य चोप्रा यांच्या 'वॉर २' चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहेत. चित्रपटाचे बजेट ४०० कोटी रुपये आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'वॉर २' हा २०१९ मध्ये आलेल्या 'वॉर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'वॉर' मध्ये ऋतिक रोशनसोबत टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होता. १७० कोटींच्या बजेट असलेल्या या चित्रपटाने ४७५.६२ कोटींचा व्यवसाय केला होता.

Read more Photos on

Recommended Stories