Saiyaara box office collection : सैयाराने पहिल्याच आठवड्यात २०० कोटींचा टप्पा ओलांडला

Published : Jul 25, 2025, 09:46 AM ISTUpdated : Jul 25, 2025, 09:50 AM IST

मुंबई - नवोदित कलाकार अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या 'सैयारा' या रोमँटिक म्युझिकल ड्रामाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. 

PREV
14
वीकेंडमध्ये वाढ झाली

अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या 'सैयारा'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट पहिल्या दिवशी २१.५ कोटींसह प्रदर्शित झाला आणि वीकेंडमध्ये त्यात वाढ झाली. या चित्रपटाला सिनेरसिकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

24
सातव्या दिवशी ११.७१ कोटी जमवले

सैयाराने सातव्या दिवशी ११.७१ कोटी जमवले, एकूण कमाई १६५.४६ कोटी झाली. परदेशातही ३७ कोटींची कमाई झाली आहे. एकूण २०२.४६ कोटींची कमाई करत २०० कोटींचा टप्पा ओलांडला.

34
Netflix वर कधी येणार...

सैयारा १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे Netflix ने स्ट्रीमिंग हक्क मिळवले आहेत. सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबर सुरुवातीस तो स्ट्रीमिंगला येईल. प्रेक्षकांना याची प्रतिक्षा राहणार आहे.

44
नवीन चेहरे

सैयाराच्या यशामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत नवीन चेहरे आणि मूळ कंटेंटची वाढती मागणी अधोरेखित होते. या चित्रपटातील स्टार्स अगदी नवीन आहेत. तरीही त्यांचा चित्रपट चांगला चालल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Read more Photos on

Recommended Stories