
अनेक दशकांपासून बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचं दुःखद निधन झालं आहे. ते ५६ वर्षांचे होते. मुश्ताक खान गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. मृत्यूआधी त्यांच्यावर सलग १५ दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.