Love And War: लव्ह अँड वॉरमधील रणबीर कपूरचा फर्स्ट लूक रिलीज, विंटेज अवतार अन् रक्ताने माखलेला हात!

vivek panmand   | CMS
Published : Sep 24, 2026, 03:22 PM IST
Love And War: लव्ह अँड वॉरमधील रणबीर कपूरचा फर्स्ट लूक रिलीज, विंटेज अवतार अन् रक्ताने माखलेला हात!

सार

संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटातील रणबीर कपूरचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यात त्याचा रेट्रो अवतार आणि रक्ताने माखलेला हात लक्ष वेधून घेत आहे. आलिया भट्ट आणि विकी कौशल स्टारर हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी रिलीज होणार आहे.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी प्रेक्षकांना रणबीर कपूरच्या लव्ह अँड वॉर मधील लूकची पहिली झलक दाखवली आहे. २४ सप्टेंबरला रिलीज झालेल्या या नव्या पोस्टरने सोशल मीडियावर चांगलीच हवा केलीय. या पोस्टरमध्ये रणबीर एका निळ्या रंगाच्या ओपन कारमध्ये बसलेला दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावर मिशी, डोळ्यांवर चष्मा आणि गाडीच्या दरवाजावर ठेवलेला रक्ताने माखलेला हात असा त्याचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतोय.

आलिया भट्ट आणि विकी कौशल यांचीही मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी थिएटरमध्ये धडकणार आहे.

रणबीरचा हा अवतार एकदम हटके

रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये तुम्ही पाहू शकता की, रणबीर एका क्लासिक निळ्या कारमध्ये बसलाय. त्याने हलक्या रंगाचे कपडे घातलेत, सोबत मिशी आणि चष्मा त्याच्या लूकला आणखी भारी बनवतोय. त्याचा हा नीटनेटका लूक आणि डाव्या हातावर लागलेला मार, रक्त यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

या पोस्टरमध्ये रणबीरचा एकदम ओल्ड-स्कूल (विंटेज) लूक पाहायला मिळतोय. पण त्याच्या व्यक्तिरेखेबद्दलचे बाकीचे डिटेल्स मात्र अजूनही गुलदस्त्यातच ठेवण्यात आलेत. मेकर्सनी हे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, “वो रुतबा, वो रौब, वो जुनून!” आणि सोबतच २१ जानेवारी २०२७ ही रिलीज डेटही कन्फर्म केली आहे.

'लव्ह अँड वॉर'चे शूटिंग पूर्ण

चित्रपटाचं मुख्य शूटिंग नुकतंच पूर्ण झालं असून त्यानंतर लगेचच हे पोस्टर रिलीज करण्यात आलंय. नोव्हेंबर २०२४ मध्ये 'लव्ह अँड वॉर'च्या शूटिंगला सुरुवात झाली होती. अनेक शेड्युल पार पडल्यानंतर काही दिवसांपूर्वीच शूटिंग संपलं. आता हा चित्रपट पोस्ट-प्रॉडक्शनच्या टप्प्यात पोहोचला आहे.

या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे, 'सावरिया' या आपल्या पहिल्या चित्रपटानंतर रणबीर पुन्हा एकदा भन्साळींसोबत काम करतोय. तर 'गंगूबाई काठियावाडी'नंतर आलियाही भन्साळींच्या दिग्दर्शनाखाली पुन्हा झळकणार आहे.

आलिया, विकी आणि रणबीरचे आगामी प्रोजेक्ट्स

'लव्ह अँड वॉर' व्यतिरिक्त हे तिन्ही स्टार्स त्यांच्या इतर प्रोजेक्ट्समध्येही बिझी आहेत. रणबीर लवकरच 'रामायण: पार्ट वन' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर आलिया नुकतीच 'अल्फा' चित्रपटात दिसली होती. दुसरीकडे, विकी कौशल 'महावतार' या चित्रपटात काम करत असून त्यात तो चिरंजीवी परशुरामांची भूमिका साकारणार आहे.

'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी जगभरात हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Tiger Shroff Firing : 250 कोटींचा मालक टायगर श्रॉफ, पण अभिनेत्यावर गोळीबारासाठी 50 हजारांची सुपारी?
Sai Pallavi : 'रामायण'साठी नाही, तर आधीपासूनच शाकाहारी आहे; साई पल्लवीने सांगितला जपानमधला किस्सा