Shah Rukh Khan : पान मसाला वादादरम्यानही शाहरुख खान नंबर 1 श्रीमंत अभिनेता; पाहा 2, 3, 4 नंबरवर कोण?

Published : Sep 24, 2026, 03:46 PM IST
Shah Rukh Khan : पान मसाला वादादरम्यानही शाहरुख खान नंबर 1 श्रीमंत अभिनेता; पाहा 2, 3, 4 नंबरवर कोण?

सार

२०२६ ची हुरुन इंडिया रिच लिस्ट जाहीर झाली आहे. यात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान १० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यापाठोपाठ अमिताभ बच्चन आणि सलमान खानचा नंबर लागतो.

मुंबई : चित्रपटसृष्टीत सर्वात श्रीमंत कोण, हे सांगणारी 'हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६' जाहीर झाली आहे. यंदाही बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. त्याची एकूण संपत्ती १० हजार कोटी रुपये आहे. 'बोलो जुबां केसरी' म्हणत तरुणांची दिशाभूल करणाऱ्या पान मसाला जाहिरातीमुळे शाहरुख सध्या वादात अडकला आहे. पण "लोक काहीही म्हणोत, मी ही जाहिरात सोडणार नाही. मला याचे पैसे मिळतात, मग यात मी काय एवढी मोठी चूक केली?" असा सवाल त्याने विचारला होता. या जाहिरातीसाठी त्याला किती कोटी मिळाले, हे अद्याप समोर आलेलं नाही. पण सध्या तो श्रीमंतांच्या यादीत टॉपवर आहे.

शाहरुखची सध्याची एकूण संपत्ती १०,००० कोटी रुपये आहे. यात फक्त चित्रपट आणि जाहिरातींची कमाई नाही, तर 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' आणि 'नाईट रायडर्स स्पोर्ट्स' यांसारख्या त्याच्या व्यवसायांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही तोच टॉपवर होता. पण अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याची संपत्ती सुमारे २,५०० कोटी रुपयांनी कमी झाली आहे. गेल्या वर्षी त्याची संपत्ती १२,४९० कोटी रुपये होती. एवढी मोठी घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता राहिला आहे, हे विशेष.

पुढच्या नंबरवर कोण?

शाहरुखच्या पाठोपाठ अमिताभ बच्चन यांचा नंबर लागतो. त्यांची संपत्ती ४,००० कोटी रुपये आहे. तर ३,००० कोटी रुपयांच्या संपत्तीसह सलमान खान तिसऱ्या स्थानावर आहे. हृतिक रोशन २,५०० कोटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर आहे. अभिनेत्यां व्यतिरिक्त चित्रपटसृष्टीतील इतर लोकांच्या यादीवर नजर टाकली, तर 'रामायण'चे निर्माते नमित मल्होत्रा यांचे वडील नरेश मल्होत्रा यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यांची सध्याची संपत्ती १६,००० कोटी रुपये आहे.

शाहरुख खानचा आगामी सिनेमा

शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'किंग' सिनेमावर काम करत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा एक ॲक्शन-थ्रिलर सिनेमा आहे. तीन वर्षांनंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यावर परतणार असल्याने हा सिनेमा चाहत्यांसाठी खूप खास आहे. तो शेवटचा २०२३ मध्ये रिलीज झालेल्या 'डंकी' सिनेमात दिसला होता. 'किंग'मध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहे. 'द आर्चीज'मधून अभिनयात पदार्पण करणारी किंग खानची मुलगी सुहाना खानही या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 'ऑपरेशन सफेद सागर' फेम अभय वर्मा देखील या सिनेमाचा भाग असेल. रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चन या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

नुकतंच, शाहरुख खानने 'X' (ट्विटर) वर "Ask Me Anything" सेशन घेतलं होतं. यात त्याने स्पष्ट केलं की 'किंग' सिनेमा पुढे ढकलला जात नाहीये आणि तो २४ डिसेंबर २०२६ रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Love And War: लव्ह अँड वॉरमधील रणबीर कपूरचा फर्स्ट लूक रिलीज, विंटेज अवतार अन् रक्ताने माखलेला हात!
पुण्यात जॅकी श्रॉफ यांची भाऊसाहेब रंगारी गणपतीला भेट | Bhausaheb Rangari Ganpati Mandal Pune