सलमान खानला बिष्णोई समाज माफ करणार असून त्यांनी त्याच्यापुढे एक अट ठेवली आहे.
सलमान खानच्या घरावर गोळीबार होऊन एक महिना होऊन गेला असून या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नव्हती. या घटनेचा तपास पोलिसांकडून चालू असून अनमोल बिष्णोई यांनी फेसबुकवरून गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. सलमान खानने काळवीट हत्या केल्यापासून बिष्णोई गॅंगला खून करण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली नाही.
बिष्णोईला केले अखेर माफ -
लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून सलमान खानला जीवे मारण्याची अनेकवेळा धमकी देण्यात आली होती. पण अखेर सलमान खानला माफ करण्यात आले आहे. अभिनेत्री सोमा अलीने बिष्णोई समाजाकडे सलमान खानला माफ करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली होती. पण यासाठी बिष्णोई समाजाने एक अट ठेवल्याचे सांगण्यात आले आहे. सलमान खानने समाजाची मंदिरासमोर येऊन माफी मागावी, बिष्णोई समाज माफ करेल असे सांगण्यात आले आहे.
सलमान खान माफी मागेल का? -
सलमान खान माफी मागेल का नाही याबद्दल मात्र साशंकता आहे. बिष्णोई समाजाचे साधू, संत, मोठे नेते, प्रमुख पंच आणि सर्वच जण सलमान खानला माफ करू शकतात. पण त्यासाठी सलमान खानने सर्वात आधी मंदिरासमोर येऊन माफी मागायला हवी. त्याने येथे येऊन मी कधीही समाजाची फसवणूक करणार नाही आणि पर्यावरणाचे संरक्षण करेल असा शब्द द्यायला हवा, असे समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आणखी वाचा -
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, कर्करोगामुळे लोकसभा निवडणूक प्रचारापासून होते दूर
व्यायामशाळेत मुलीवर केला क्रूर अत्याचार, मरेपर्यंत जनावराप्रमाणे ओरबाडून घेतला जीव