अखेर ठरलं! सलमान खानच करणार Bigg Boss 18 चे सूत्रसंचालन, या दिवशी होणार प्रीमियर

Published : Sep 02, 2024, 09:05 AM ISTUpdated : Sep 02, 2024, 09:07 AM IST
salman khan will host bigg boss 18

सार

Bigg Boss Season 18 Update : बिग बॉस-18 संदर्भात सुरु असलेल्या अफवांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शो चे सूत्रसंचालन सलमान खानच करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या शो चा प्रीमियर येत्या 5 ऑक्टोंबरला असण्याची शक्यता आहे.

Bigg Boss Season 18 Update : बिग बॉस सीजन-18 सुरु होण्याची प्रेक्षकांकडून आवर्जुन वाट पाहिली जात आहे. या शो संदर्भात गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सलमाान खान आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करत असल्याने शो चे सूत्रसंचालन करणार नाही अशी बातमी व्हायरल झाली होती. यामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. अशातच आता बिग बॉस 18 चे सूत्रसंचालन सलमान खानच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय शो चा प्रीमियर येत्या 8 ऑक्टोंबरला असल्याचे बोलले जात आहे.

बिग बॉस 18 संदर्भात महत्वाचे अपडेट
बिग बॉस ओटीटी सीजन-3 संपल्यानंतर आता सीजन 18 ची वाट पाहिली जात आहे. खरंतर, सलमान खान शो चे सूत्रसंचालन करणार असल्याने सर्वजण आनंदीत झाले आहेत. सलमान खान सूत्रसंचालन करणार नसल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होता. पण आता अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

कधी सुरु होणार बिग बॉस-18
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस 18 चा प्रीमियर पुढील महिन्यात 18 ऑक्टोंबरला असणार आहे. निर्मात्यांकडून शो सुरु करण्याची तयारी केली जात आहे. या शो चे सूत्रसंचालनच्या प्रोमोचे लवकरच शूट केले जाणार आहे. याशिवाय निर्मात्यांकडून शो साठी काही सेलिब्रेटींना विचारले जात आहे.

बिग बॉसच्या घरातील स्पर्धक
बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यामध्ये धीरज धूपर,शाहीर शेख, सुधांशु पांडे, रिम शेख, जन्नत जुबैर, फैसल शेख, अंजली आनंद, चाहत पांडे, जान खान यांची नावे समोर आली आहेत.

सलमान खानचा आगामी सिनेमा
सलमान खान आगामी सिनेमा सिकंदरची शूटिंग करत आहे. मुंबईत सिनेमाचे शूटिंग 45 दिवस असणार आहे. शूटिंगसाठी मुंबईत एका स्टुडियोमध्ये मोठा सेट तयार करण्यात आला आहे. शूटिंगसाठी रश्मिका मंदाना देखील उपस्थितीत राहणार आहे. सिनेमा वर्ष 2025 रोजी ईद ला रिलीज होणार आहे.

आणखी वाचा : 

साऊथ बॉक्स ऑफिसवर विजय विरुद्ध ज्युनियर एनटीआर: सप्टेंबरमध्ये धमाका!

साउथ सिनेमातील महिलांच्या लैंगिक अत्याचारावर समंथाने केली मोठी मागणी, म्हणाली...

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!