अभिनेता एजाज खानला मोठा झटका, लाखो फॉलोअर्स तरीही विधानसभेत मिळाली केवळ 146 मत

Published : Nov 23, 2024, 05:27 PM IST
Ajaz Khan

सार

बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानला वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला आहे. खरंतर, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असूनही अत्यंत कमी मतं एजाजला मिळाली आहेत.

Big Boss contstant Ajaz Khan defeat : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील वर्सोवा जागा सर्वाधिक चर्चेत आहे. येथून निवडणूक लढवणारा बिग बॉस फेम एजाज खानला निकालानंतर मोठा झटका बसला आहे. एजाज खान खरंतर सोशल मीडियावर लोकप्रिय असला तरीही जनतेने त्याला निवडणुकीत मत दिली नाहीत. एजाज खानचे सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर 56 लाख, फेसबुक 41 लाख फॉलोअर्स आहेत. पण तरीही निवडणुकीत केवळ एजाजला 146 मत मिळाली आहेत. एजाजच्या विरोधात नगीना खासदार चंद्रशेखर आजाद रावण यांचा पक्ष आजाद समाज पक्ष कांशीराममधील उमेदवार होता. वर्सोवा जागेवरुन उद्धव ठाकरे यांच्या गटातील उमेदवार हारुन खान विजयी झाले आहेत. स्वत:ला भाईजान म्हणून संबोधणाऱ्या एजाज खानला निकालानंतर जोरदार धक्का बसला आहे.

PREV

Recommended Stories

अक्षय खन्नाचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा! करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारे 'हे' ५ चित्रपट कोणते? पाहा यादी!
Dhurandhar Banned : 300 कोटी कमावणारा धुरंधर पाकिस्तानमध्ये नव्हे तर या 6 देशांमध्ये का झाला बॅन?