Bigg Boss 19 Month Complete : सलमान खानच्या बिग बॉस 19 ला एक महिना पूर्ण झाला आहे. दरवेळेप्रमाणे यंदाही सलमान खान हा शो होस्ट करत आहे. त्याने प्रीमियरच्या दिवशी 16 स्पर्धकांना घरात एन्ट्री दिली होती. जाणून घ्या गेल्या महिन्याभरात नेमके काय घडले…
सलमान खान बिग बॉस 19 ( Bigg Boss 19 Month Complete )
टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉसच्या नवीन सीझनची प्रेक्षक दरवर्षी आतुरतेने वाट पाहतात. यंदाच्या सीझन 19 ची सुरुवात 24 ऑगस्ट रोजी झाली. सलमान खानच्या शोचा ग्रँड प्रीमियर झाला होता. हा शो जिओ सिनेमा आणि कलर्स चॅनलवर पाहता येतो. चला, जाणून घेऊया या शोमध्ये महिनाभरात काय काय घडलं...
सलमान खानच्या बिग बॉस 19 शोच्या सुरुवातीच्या काही दिवसांतच, फरहाना भट्टने असे काही केले की बिग बॉसने तिला सीक्रेट रूममध्ये पाठवले. ती या रूममधील टीव्हीवरून घरातील सदस्यांना पाहायची आणि टास्कमध्येही भाग घ्यायची.
बिग बॉस 19 मधील सर्वात वयस्कर स्पर्धक कुनिका सदानंद (61) आहेत. घरात येताच त्यांनी आपला दरारा निर्माण केला. त्यांनी किचनवर ताबा मिळवून सर्वांवर हुकूम गाजवला. त्यांना घराचा पहिला कॅप्टनही बनवण्यात आले. कॅप्टन बनण्यापूर्वी गौरव खन्नासोबत त्यांचे जोरदार भांडण झाले होते.
गौरव खन्नामुळे बिग बॉस 19 च्या घरात फरहाना भट्टचे पुनरागमन झाले. मात्र, परत येताच तिने घरात जबरदस्त गोंधळ घातला. तिने नीलम गिरी, बसीर अली, अमाल मलिक आणि झीशान कादरी यांच्याशी भांडण केले. तिने नीलमला तर लायकीत राहण्यास सांगितले होते.
59
नेहल चुडासमा वाद ( Bigg Boss 19 Month Complete )
बिग बॉस 19 च्या घरात नेहल चुडासमा ही अशी स्पर्धक आहे, जिला इतरांच्या भांडणात नाक खुपसायची सवय आहे. घरात अनेकदा दोन लोकांमध्ये वाद होत असताना नेहल मध्येच बोलते आणि भांडण आणखी वाढवते. एकदा तर तिने तान्याला तुझ्या तोंडाला वास येतोय, असेही म्हटले होते.
69
बसीर अली आणि अभिषेक बजाजमध्ये राडा ( Bigg Boss 19 Month Complete )
बिग बॉस 19 च्या घरात आतापर्यंत बसीर अली आणि अभिषेक बजाज यांच्यात सर्वाधिक भांडणे झाली. एका महिन्यात ते अनेकवेळा भिडले. एका टास्कदरम्यान दोघांमध्ये हाणामारी झाली आणि शिवीगाळही झाली. त्यांचे भांडण इतके वाढले की घरातील सदस्यांना मध्यस्थी करावी लागली.
79
होस्ट फराह खान ( Bigg Boss 19 Month Complete )
बिग बॉस 19 सुरू झाल्यापासून आतापर्यंत 4 वेळा 'वीकेंड का वार' झाला आहे. यापैकी 3 सलमान खानने आणि 1 फराह खानने होस्ट केला. फराहसोबत अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि सौरभ शुक्ला देखील दिसले होते. फराहचा 'वीकेंड का वार' खूप पसंत केला गेला होता.
89
सलमान खानने घेतली स्पर्धकांची शाळा ( Bigg Boss 19 Month Complete )
सलमान खान जेव्हा जेव्हा 'वीकेंड का वार'मध्ये आला, तेव्हा त्याने काही स्पर्धकांची शाळा घेतली. त्याने सर्वात जास्त नेहल आणि फरहानाला फटकारले. तर, नुकत्याच झालेल्या 'वीकेंड का वार'मध्ये त्याने गौरव खन्ना आणि मृदुल तिवारी यांना धारेवर धरले होते.
99
नगमा-नतालिया बिग बॉस 19 मधून बाहेर ( Bigg Boss 19 Month Complete )
बिग बॉस 19 च्या घरातून आतापर्यंत नगमा मिराजकर आणि नतालिया जानोसजेक या 2 स्पर्धक बाहेर पडल्या आहेत. तिसरी स्पर्धक नेहल बाहेर झाली आहे, पण तिला सीक्रेट रूममध्ये पाठवण्यात आले आहे. यावेळच्या शोमध्ये 2 आठवडे कोणतेही एव्हिक्शन झाले नव्हते.