Luxury Cars Smuggling : दक्षिण भारतीय अभिनेता दुलकर सलमानच्या घरी कस्टम अधिकाऱ्यांनी छापा टाकला असून, त्याच्या 2 गाड्या जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. या कार तस्करी केलेल्या असल्याचे समोर आले आहे.
प्रसिद्ध मल्याळम अभिनेते मामूट्टी यांचा मुलगा दुलकर सलमान, सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याचे तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्येही प्रचंड चाहते आहेत.
24
लोका चित्रपट:
तो एक यशस्वी निर्माताही आहे. त्याच्या 'लोका चॅप्टर 1' चित्रपटाने २५० कोटींहून अधिक कमाई केली. सध्या त्याच्याकडे दोन तेलुगू आणि एक मल्याळम चित्रपट आहे.
34
2 आलिशान गाड्या जप्त
दुलकर सलमान आणि पृथ्वीराज यांच्या घरी आणि कार्यालयांवर कस्टमने छापे टाकले. यात दुलकरच्या मालकीच्या 2 आलिशान गाड्या जप्त केल्या. या गाड्या भूतानमार्गे भारतात तस्करी केल्याचे उघड झाले आहे.
त्याच्या मालकीच्या विविध ठिकाणी केलेल्या तपासणीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. याप्रकरणी लवकरच दुलकर सलमानची चौकशी होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.