''रंजना मला फॉलो करायची'', अशोक सराफ यांनी रंजना देशमुखसोबतच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा

Published : Jul 22, 2025, 04:15 PM ISTUpdated : Jul 22, 2025, 04:18 PM IST

अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांची मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडीने एकेकाळी इंडस्ट्री गाजवली. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि 'बिन कामाचा नवरा', 'सासू वरचढ जावई' सारख्या चित्रपटांमधील कामगिरी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 

PREV
15
अशोक सराफने जुन्या आठवणींना दिला उजाळा, रंजना देशमुखच्या आठवणीनं व्याकुळ

बिन कामाचा नवरा हा सिनेमा तर सुपरहिट ठरला. आजही हा सिनेमा प्रेक्षक तितक्यात आवडीनं पाहतात. रंजनाकडे शिकण्याची खूप जिद्द होती. त्यामुळे ती ते करू शकली.

25
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी म्हणजे अशोक सराफ आणि रंजना देशमुख

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी म्हणजे अशोक सराफ आणि रंजना देशमुख ही प्रसिद्ध जोडी आहे. या दोघांनी मिळून मराठी इंडस्ट्रीतील जुना काळ गाजवला.

35
ऑनस्क्रीन जोडी ठरली हिट

ऑनस्क्रीन रंजना आणि अशोक यांची जोडी सुपरहिट ठरली. त्या दोघांची केमिस्ट्री खूप चांगली होती. रंजना यांनी अपघातानंतर ब्रेक घेतला पण तरी त्यांची जोडी सुपरहिट ठरली होती.

45
कोणत्या चित्रपटात एकत्र काम केलं?

बिन कामाचा नवरा', 'सासू वरचढ जावई', 'एक डाव भुताचा', 'गोंधळात गोंधळ', 'गुपचूप गुपचूप', 'सुळावरची पोळी सारख्या सिनेमात अशोक सराफ आणि रंजना यांनी एकत्र काम केलं आहे.

55
अशोक सराफ यांनी रंजना देशमुख यांचं केलं कौतुक

शोक सराफ म्हणाले, "रंजना देशमुख खूप चांगली नटी होती. खूप मेहनती होती. एखादी गोष्ट जमत नाही म्हणजे काय...मी हे करून दाखवीनच... मला हे यायलाच पाहिजे. असं तिचं असायचं." ती मला फॉलो करायची हे तिनेच मला सांगतिलं होतं. मी तुला बघते आणि काम करते, असं ती मला म्हणाली होती.

Read more Photos on

Recommended Stories