
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आलेत. नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात ते दिसले आणि त्यांच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या चर्चा सुरू झाल्या. मुंबईत झालेल्या एका आध्यात्मिक संगीत कार्यक्रमात हे जोडपं सहभागी झालं होतं. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, अनुष्का तिसऱ्यांदा आई होणार का, असा प्रश्न आता चाहते विचारू लागलेत. मात्र, अनुष्का किंवा विराट दोघांनीही यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
२५ ऑक्टोबरला अनुष्का आणि विराट मुंबईतल्या वरळीत असलेल्या डोम, एसव्हीपी स्टेडियमवर गेले होते. तिथे अमेरिकन कीर्तनकार कृष्णा दास यांच्या लाईव्ह कीर्तनाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम त्यांच्या इंडिया टूरचा एक भाग होता.
Is Anushka sharma expecting baby No 3 😭
Rumous about Anushka sharma's pregnancy are creating buzz on social media. https://t.co/qKLVo0aiyn
— Ashwini (@GhortaleAshwini) October 26, 2026
या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. यात अनुष्का आणि विराट एकत्र बसून टाळ्या वाजवताना आणि भजनात तल्लीन झालेले दिसत आहेत. संगीतात रमलेल्या या जोडप्याने लगेचच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.
हे व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर अनुष्काच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल चर्चा रंगू लागल्या. अनुष्का पुन्हा प्रेग्नंट आहे का, असे प्रश्न लोक विचारू लागले. त्यामुळे त्यांची ही उपस्थिती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. पण, या सगळ्या फक्त सोशल मीडियावरील चर्चा आहेत. प्रेग्नेंसीच्या या बातम्यांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
डिसेंबर २०१७ मध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लग्नबंधनात अडकले. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी मुलगी वामिकाचं स्वागत केलं. तर, फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांचा मुलगा अकायचा जन्म झाला.
हे जोडपं नेहमीच आपली वैयक्तिक माहिती खाजगी ठेवणं पसंत करतं. महत्त्वाच्या गोष्टी ते स्वतःहून चाहत्यांसोबत शेअर करतात. याआधीही अनुष्काच्या प्रेग्नेंसीच्या अफवा उडाल्या होत्या. त्यामुळे केवळ चर्चांवरून ती प्रेग्नंट असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही.
सध्या तरी अनुष्का शर्मा किंवा विराट कोहली या दोघांपैकी कोणीही तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यांच्या नुकत्याच झालेल्या उपस्थितीमुळे इंटरनेटवर चर्चा रंगली असली, तरी या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आणखी एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार की नाही, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना त्यांच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल.