Ramayana Box Office Clash : 'रामायण'ला अक्षय कुमारची टक्कर, 32 वर्ष जुना सिनेमा पुन्हा रिलीज होणार

Published : Oct 26, 2026, 11:31 PM IST
Ramayana Box Office Clash : 'रामायण'ला अक्षय कुमारची टक्कर, 32 वर्ष जुना सिनेमा पुन्हा रिलीज होणार

सार

५ नोव्हेंबरला यश आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित 'रामायण' सिनेमा रिलीज होतोय. या मेगा बजेट चित्रपटाला टक्कर देण्यासाठी अक्षय कुमारचा १९९४ चा ब्लॉकबस्टर सिनेमा ६ नोव्हेंबरला पुन्हा थिएटरमध्ये येतोय. बॉक्स ऑफिसवर या दोन चित्रपटांची जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.

मुंबई : यश आणि रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा सिनेमा ५ नोव्हेंबरला जगभरात रिलीज होतोय. या मेगा बजेट चित्रपटाला थेट भिडण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा १९९४ चा सुपरहिट सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये धडक मारणार आहे.

अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचा क्लासिक ब्लॉकबस्टर 'मोहरा' (Mohra) ६ नोव्हेंबरला डिजिटल स्वरूपात रि-रिलीज होतोय. यामुळे यशच्या 'रामायण' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर एका ३२ वर्ष जुन्या चित्रपटाचं तगडं आव्हान मिळणार आहे.

१९९४ मध्ये राजीव राय यांनी 'मोहरा' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्या काळातला हा सर्वात मोठा हिट सिनेमा होता. सुनील शेट्टी, नसीरुद्दीन शाह आणि परेश रावल यांसारख्या दिग्गजांनी यात काम केलंय. या चित्रपटातील तू चीज बडी है मस्त मस्त आणि टिप टिप बरसा पानी ही गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत.

या चित्रपटाला ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने हा सिनेमा 'Restored' व्हर्जनमध्ये ६ नोव्हेंबरला पुन्हा रिलीज केला जातोय. नुकताच या चित्रपटाच्या टीमने यूट्यूबवर एक नवीन टीझर रिलीज केलाय, ज्यामुळे प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

कोट्यवधींची कमाई करण्यासाठी 'रामायण' सज्ज

दुसरीकडे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित 'रामायण' बॉक्स ऑफिसवर सुनामी आणण्यासाठी तयार आहे. यात रॉकिंग स्टार यशने रावणाची तर रणबीर कपूरने रामाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचं अ‍ॅडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे. परदेशात या चित्रपटाच्या तिकीट विक्रीने तब्बल १८.९९ कोटींचा टप्पा ओलांडलाय. एकट्या उत्तर अमेरिकेत ७.१२ कोटींचं कलेक्शन झालंय.

भारतात पहिल्याच दिवशी 'रामायण' ११० कोटींहून अधिक नेट कलेक्शन करेल असा अंदाज आहे. जगभरात पहिल्या दिवशी हा सिनेमा २०० कोटींची ओपनिंग घेऊ शकतो, अशी अपेक्षा आहे. दिवाळीच्या सुट्टीत यश आणि रणबीरच्या या महाकाव्याला अक्षय कुमारचा जुना नॉस्टॅल्जिक सिनेमा किती टक्कर देतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Imran Khan : अभिनेता इम्रान खानला 'भारत सोडा' नोटीस; मुंबई उच्च न्यायालयात धाव
Tom Cruise Fitness : 'मिशन इम्पॉसिबल' स्टार वयाच्या 64व्या वर्षीही फिट, टॉम क्रूझ फिटनेस सिक्रेट