दोन लग्न करूनही अमीर खान करणार तिसरे लग्न, कपिल शर्माच्या शोमध्ये दिली कबुली

Published : Apr 24, 2024, 07:32 PM IST
aamir khan at the great indian kapil show

सार

अमीर खान हा त्याच्या हुशारीची कायम ओळखला जातो. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये कपिल शर्माच्या शोमध्ये गेल्याच दिसून येत आहे. 

अमीर खान हा त्याच्या हुशारीची कायम ओळखला जातो. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये कपिल शर्माच्या शोमध्ये गेल्याच दिसून येत आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शोच्या’ कार्यक्रमात अमीर गेला असून तो पहिल्यांदाच कपिलच्या शोमध्ये दिसून येणार आहे. आपल्याला माहित असेल की अमीर खान याने दोन लग्न केले असून तो तिसरे लग्न करतो का याबाबत कपिल शर्मा याने प्रश्न विचारला आहे. त्याला अमीर खान काय उत्तर देतो, हे व्हिडिओमध्ये सांगितले आहे. 

कपिल शर्माच्या प्रश्नाला अमीर खानने दिले उत्तर - 
कॉमेडियन कपिल शर्माचा शो प्रेक्षकांचा पहिल्यापासून मनोरंजन करत आला आहे. त्याचा नवीन शो नेटफ्लिक्सवर येणार असून त्याचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. अमीर खानला यावेळी कपिल शर्माने अनेक मजेदार प्रश्न विचारले आहेत. तो यामध्ये त्याला विचारतो की, तू आता सेटल हो. तसेच पुढे म्हणतो की, तू पुरस्कार स्वीकारायला का जात नाही, त्यावर बोलताना त्याने वेळ खूप मौल्यवान असून त्याचा योग्य प्रकारे वापर करायला हवा. अमीरला त्याच्या मुलाबद्दल यावेळी विचारण्यात आले असून त्याने सर्व प्रश्नांची मजेशीर उत्तरे दिली आहेत. 

फ्लॉप चित्रपटांवर अमीर खानची प्रतिक्रिया - 
कपिल शर्माच्या शोमध्ये चित्रपटांच्या बाबत अमीर खानने माहिती दिली आहे. त्याने त्याचे मागील दोन चित्रपट फ्लॉप गेल्याची माहिती दिली. कपिल शर्मा पुढे म्हणतो की, जो चित्रपट चालत नाही, तो चित्रपट चांगली कमाई करतो. तो त्याचा लाहोर 1947 हा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटामध्ये सनी देओल आणि प्रीती झिंटा हे दोघे यामध्ये काम करणार आहेत. प्रितीने काही दिवसांपूर्वीच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. 
 

आणखी वाचा - 
महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये भाषण करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी झाले बेशुद्ध, त्यांची प्रकृती आता कशी आहे?
तुमच्या बहिणी-मुलींना राहुल गांधींसोबत झोपायला लावा, हे काय म्हणाले काँग्रेस नेते, Watch Video

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!