काहीही न खाता जमिनीवरच झोपले बनी
रात्रभर अल्लू अर्जुन यांना तुरुंगात त्रास सहन करावा लागल्याचे समजते. अल्लू अर्जुन यांना तुरुंग अधिकाऱ्यांनी वर्ग १ बॅरेक वाटप केली होती. फक्त चहा आणि नाश्ता घेतलेल्या बनीने काहीही न खाता झोप घेतली. अल्लू अर्जुन यांना तुरुंग अधिकाऱ्यांनी नवीन उशी आणि चादर दिली होती. मात्र, बनीने ती नाकारली. सामान्य माणसाप्रमाणे जमिनीवरच झोपेन, असे ते म्हणाले. त्रास होत असतानाही तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुविधा बनीने स्वीकारल्या नाहीत. अखेर बनी शनिवारी सकाळी सुटले. तुरुंगाच्या मुख्य दरवाज्याऐवजी दुसऱ्या दरवाज्यातून पोलिसांनी अल्लू अर्जुनना कडेकोट बंदोबस्तात बाहेर काढले. माध्यमांचा गोंधळ टाळण्यासाठी असे करण्यात आल्याचे समजते. सुटका झाल्यानंतर अल्लू अर्जुन या घटनेवर काय बोलतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.