फहाद फासिल यांची संपत्ती सुमारे ५० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. मल्याळममधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक असलेले ते एका चित्रपटासाठी ३.५ कोटी ते ६ कोटी रुपये घेतात असे म्हटले जाते. फासिल यांना आलिशान गाड्यांची आवड आहे. त्यांच्याकडे पोर्श ९११ केरेरा एस, मर्सिडीज बेंझ ई-क्लास, रेंज रोव्हर वॉग्ह सारख्या गाड्या आहेत. कोची येथील प्रसिद्ध वास्तुविशारद अमल सुफिया यांनी डिझाइन केलेले आलिशान घरही त्यांचेच आहे.