अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह, अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला राहणार अनुपस्थितीत

Published : Jul 12, 2024, 03:02 PM IST
Akshay Kumar

सार

Akshay Kumar Tested COVID Positive : अक्षय कुमारची गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे. यामुळे आरोग्याची चाचणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. खरंतर, अभिनेता सातत्याने 'सरफिरा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Akshay Kumar Tested COVID Positive :  बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमार संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याने तो अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्याला उपस्थितीत राहणार नाही. याशिवाय अक्षय कुमारचा सरफिरा सिनेमा 12 जुलैला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

अक्षय कोरोना पॉझिटिव्ह
इंडिया टुडेच्या रिपोर्ट्सनुसार, अक्षयकृ कुमारची प्रकृती गेल्या दोन दिवसांपासून बिघडली होती. सासत्याने अक्षय सरफिराच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रकृती ठिक नसल्याने अक्षयने आरोग्याची चाचणी केली असता कोव्हिड पॉझिटिव्ह आल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत. यामुळे अभिनेत्याने स्वत:ला आयसोलेट केले आहे. याशिवाय डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन अक्षयकडून केले जात आहे.

अक्षयचे चाहते चिंतेत
अक्षय कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर चाहते चिंतेत पडले आहेत. याशिवाय 12 जुलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्याला अक्षय कुमार उपस्थिती लावणार होता. पण कोविड झाल्याने अक्षय लग्नसोहळ्याला अनुपस्थितीत राहणार आहे. याआधी अक्षय अनंत-राधिकच्या प्री-वेडिंग सेरेमनीसाठी जामनगर येथे पोहोचला होता. प्री-वेडिंगमध्ये अक्षयने धमाकेदार डान्सही केला होता.

राधिका-अनंतचा विवाहसोहळा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा 12 जुलैला मुंबईत ग्रँड विवाहसोहळा पार पडणार आहे. यानंतर 13 जुलैला शुभ आशीर्वाद सेरेमनी आणि 14 जुलैला ग्रँड रिसेप्शन असणार आहे. अनंतच्या लग्नासाठी जॉन सीना, माइक टायसन, जीन-क्लाउड वान डेम आणि जे शेट्टी, ब्रिटेनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन, टोनी ब्लेअर, जॉन केरी, किम कार्दशियनसह अनेक मान्यवर उपस्थिती लावण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. 

सरफिरा सिनेमा प्रदर्शित
अक्षय कुमारचा सरफिरा सिनेमा नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. सरफिरा एक बायोपिक असून, जो जीआर गोपीनाथ यांच्या आयुष्यातील सत्य घटनांवर आधारित आहे. सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी संमीश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन सुधा कोंगरा यांनी केल आहे. सरफिरा सिनेमात राधिक्का मदानही मुख्य भूमिकेत झळकली आहे. तर अक्षयसंदर्भात आलेल्या बातमीने त्याच्या चाहत्यांना चिंतेत पाडले आहेच. पण सर्वजण अक्षयची प्रकृती लवकरात लवकर सुधारण्यासाठी प्रार्थना करत आहे.

आणखी वाचा : 

Indian 2 Movie Twitter Review : कमल हसन यांचा सिनेमा हिंदुस्तानची बॉक्स ऑफिसवर रंगत फिकी, युजर्स म्हणाले...

AR Wedding साठी विदेशी पाहुण्यांची रेलचेल, किम कार्दशियन बहिणीसोबत मुंबईत दाखल

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Ramayana: ४ हजार कोटींच्या 'रामायण'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये हवा! रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर धमाका
Jailer 3: रजनीकांतचा स्वॅग, बालय्या आणि विजय सेतुपतीची एन्ट्री; 'जेलर 3' चा मेगा प्लॅन ठरला?