ऐश्वर्या राय यांनी `हॅपी न्यू इयर` या चित्रपटात अभिषेकसोबत काम करण्यास नकार दिला होता. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. शाहरुख खान, अभिषेक बच्चन, सोनू सूद, बोमन इराणी, विवान शाह, जॅकी श्रॉफ, दीपिका पदुकोण यांनी या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. फराह खान यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. फराह खान यांनी ऐश्वर्यांना एक भूमिका देण्याची ऑफर दिली होती. पण ऐश्वर्या राय यांनी ती नाकारली. पतीसोबत स्क्रीन शेअर करायला त्यांना आवडत नाही असे त्या म्हणाल्या.