संगीतकार ए.आर.रहमान यांनी आपली पत्नी सईरा बानो यांच्यापासून विभक्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर एका तासातच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मोहिनी डे यांनीही आपल्या पतीपासून घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले.
संगीतकार ए.आर.रहमान यांनी त्यांची पत्नी सईरा बानो यांना घटस्फोट देण्याची घोषणा केली आहे. २९ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटाचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.
ए.आर.रहमान यांच्यासोबत काम करणाऱ्या संगीतकार मोहिनी डे यांनीही आपल्या पतीपासून घटस्फोट घेण्याची घोषणा केली आहे. रहमान यांच्या घोषणेनंतर एका तासातच मोहिनी डे यांनीही घटस्फोटाची घोषणा केल्याने दोघांमधील संबंधांबाबत चर्चा सुरू झाली आहे. यावर रहमान आणि सईरा बानो यांच्या वकिलांनी स्पष्टीकरण दिले आहे.
रहमान आणि मोहिनी डे यांच्यात कोणताही संबंध नाही, असे वकिलांनी म्हटले आहे. सईरा आणि रहमान यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप त्यांनी alimonyबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. हा निर्णय त्यांनी सहजासहजी घेतलेला नाही.
२९ वर्षीय मोहिनी डे यांनी ए.आर.रहमान यांच्यासोबत ४० हून अधिक संगीत कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. कोलकाता येथील असलेल्या मोहिनी डे यांचे मार्क हर्ट्झ यांच्याशी लग्न झाले होते. मतभेद झाल्याने त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची आणि रहमान यांची घटस्फोटाची घोषणा एकामागून एक आल्याने संभ्रम निर्माण झाला होता.