काय सांगताय अदिती राव हैदरी व सिद्धार्थ यांनी लग्न नाही तर साखरपुडा केला...

Published : Mar 28, 2024, 05:20 PM IST
siddharth aditi rao hydari tie knot at temple in wanaparthy

सार

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा रंगली होती की,अदिती आणि सिद्धार्थ यांचा विवाह एका मंदिरात पार पडला. मात्र या चर्चाना पूर्ण विराम मिळाला आहे. दोघंनीही आपल्या सोशल मीडिया वर पोस्ट शेअर केली असून त्यात केवळ साखरपुडा केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

एंटरटेनमेंट डेस्क : बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि साऊथ चित्रपट क्षेत्रातील अभिनेता सिद्धार्थ यांचा केवळ साखरपुडा झाला असल्याचे दोघांनीही सोशल मीडिया वर शेअर करत चाहत्यांना सांगितले आहे. दरम्यान दोघांनी लग्न केलंय, अशी चर्चा होती.मात्र आता यासंपूर्ण चर्चा केवळ चुकीच्या असल्याचे सिद्ध झाले आहे. दोघांनी या एक फोटो शेअर करत या चर्चांवर मौन सोडलं आहे. अदिती व सिद्धार्थ यांनी लग्न नाही, तर साखरपुडा केला आहे. अदितीने सिद्धार्थबरोबरचा एक फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

अदिती व सिद्धार्थ यांनी बुधवारी (२७ मार्च रोजी) तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम इथं साखरपुडा केला आहे.दोघांनीही फोटोला कॅप्शन देत म्हंटलं आहे की, ‘तो हो म्हणाला,’ असं अदितीने लिहिलं आहे तर सिद्धार्थने 'ती हो म्हणाली'असं लिहिलं आहे.दोघांनी लग्न केल्याचं वृत्त तेलुगू माध्यमांनी दिलं होतं. पण अदिती व सिद्धार्थ यांनी साखरपुडा केला आहे.

दोघांची लव्ह स्टोरी कशी जुळली :

‘महा समुद्रम’ नावाच्या चित्रपटात अदिती व सिद्धार्थने एकत्र काम केलं होतं. त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आदिती व सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात पडले आणि रिलेशनशिपमध्ये होते. अनेकदा ते कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत असतात. चंदीगडमध्ये बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नालाही त्यांनी सोबत हजेरी लावली होती. ते शरवानंदच्या लग्नाला एकत्र गेले होते. याशिवाय अनेकदा ते एकत्र फिरताना दिसायचे.

आणखी वाचा:

महेश मांजरेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा; आजच्या ज्वलंत परिस्थितीवर येणार नवा चित्रपट

मुंबईतील हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड, ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी 'बिग बॉस- 17' विजेता मुनव्वर फारूकीचा समावेश

बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीसाठी आलेल्या अभिनेत्रींच्या ग्लॅमरस लुकची चर्चा, जिंकली चाहत्यांची मन

PREV

Recommended Stories

Dhurandhar X Review : अ‍ॅक्शन पॅक्ड, मास एंटरटेनर.. 'धुरंधर' पाहून प्रेक्षक काय म्हणाले?
सुंदर कविता आणि रचना अपूर्ण राहिल्या, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल केला पश्चाताप