अभिनेत्री जेनेलिया देशमुख अपघातातून बचावली, व्हिडीओ पाहून म्हणाल- जरा जपून

Published : May 24, 2025, 08:21 AM ISTUpdated : May 24, 2025, 08:52 AM IST
jeneliya deshmukh

सार

कारमध्ये बसताना ड्रायव्हरने गाडी सुरू केल्याने अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांचा गंभीर अपघात थोडक्यात टळला. सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई | प्रतिनिधी बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांचा एक गंभीर अपघात थोडक्यात टळला आहे. एका कार्यक्रमानंतर कारमध्ये बसण्याचा प्रयत्न करत असताना, ड्रायव्हरने गाडी सुरू केल्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या. हा धक्कादायक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

क्षणभराची चूक, जीवावर बेतू शकली असती! 

जेनेलिया कारमध्ये प्रवेश करत असतानाच ड्रायव्हरने चुकीच्या वेळेस गाडी पुढे सरकवली, त्यामुळे त्यांचा तोल जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. सुदैवाने आजूबाजूच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना सावरण्यात मदत केली आणि मोठा अनर्थ टळला.

या घटनेचा व्हिडीओ काही सेकंदांतच इंटरनेटवर व्हायरल झाला असून, चाहत्यांनी जेनेलियाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही जणांनी ड्रायव्हरच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे, तर काहींनी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दाखवून दिल्या आहेत.

जेनेलिया यांनी घटनेनंतर कोणतीही तक्रार न करता हसत हसत परिस्थिती हाताळली, मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचा काही क्षणांची भीती दिसून येत आहे. अशा प्रकारच्या चुकांमुळे सेलिब्रिटींसह सर्वसामान्य व्यक्तींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?