
फलटण येथील डॉक्टर महिलेच्या सुसाईड प्रकरणातील रोज नवे खुलासे बाहेर येताना दिसून येत आहे. या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर आणि डॉक्टर तरूणी यांच्यात वाद झाल्यानंतर डॉक्टरने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला होता. मानसिक तणावात असलेल्या तरुणीने हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुसाईड केली.
तरुणीच्या फ्लॅटला लॉक लावल्यामुळे तिला हॉटेलवर जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळं ती हॉटेलवर गेली आणि तिथंच तिने सुसाईड केली. आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी काल (ता, २६) पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तब्बल चार पथके रवाना करण्यात आली होती.
२४ तासांनी प्रशांतला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबतच पीएसआय गोपाळ बदने हा रात्री उशिरा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्याच्या आधी तिच्या फ्लॅटला प्रशांतने लॉक लावलं होतं. या वादानंतर प्रशांत बनकरने तू आमच्या इथे राहायचं नाही आणि यायचं नाही असं म्हटल्याचं सांगितलं जातंय. ऐनवेळी कुठं जायचं म्हणून महिला डॉक्टरने लॉजवर राहण्याचा निर्णय घेतला.
मानसिक तणावात असणाऱ्या डॉक्टर तरूणीने यासंदर्भात पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना वारंवार कॉल केले होते, अशी माहिती माहिती एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. डॉक्टर तरुणी प्रशांत बनकरच्या फ्लॅटला कुलूप लावल्यानंतर आरोपी तरुणी लॉजवर गेली. रात्री तिने चेक इन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाहेर न आल्यामुळे तिच्या घराचे लॉक तोडलं तर तिचा मृतदेह दिसून आला.