५० वर्षानंतर जबरी गुन्ह्यातील 'या' आरोपीला पोलिसांनी केली अटक, करून बसला होता मोठं कांड

Published : Oct 15, 2025, 11:33 AM IST
mumbai murder

सार

मुंबई पोलिसांनी १९७७ सालच्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील एका आरोपीला तब्बल ४८ वर्षांनंतर अटक केली आहे. ७७ वर्षीय चंद्रशेखर काळेकर जामिनावर सुटल्यानंतर फरार झाला होता. 

मुंबई: मुंबई पोलिसांनी तब्बल ४८ वर्षांपासून फरार असलेल्या ७७ वर्षीय आरोपीला अखेर अटक करण्यात यश मिळवले आहे. आरोपीचे नाव चंद्रशेखर मधुकर काळेकर असून, तो १९७७ साली मुंबईतील कोलाबा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खून करण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणात (IPC कलम ३०७) आरोपी होता. जवळपास ५० वर्षांपासून पोलिसांना चकवा देत पळून राहिल्यानंतर अखेर त्याचा शोध लागला आहे.

गंभीर हल्ला करून गेला पळून 

त्यावेळी काळेकरने एका महिलेला धारदार शस्त्राने पोट, पाठ आणि हातावर वार करून गंभीर जखमी केले होते. जखमी महिलेचे प्राण वाचले तरी हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा मानला गेला होता. काळेकरला अटक करून १५ दिवस तुरुंगात ठेवण्यात आले, परंतु जामिनावर सुटल्यानंतर तो न्यायालयात हजर झाला नाही आणि पळून गेला.

पोलिसांच्या तपासानुसार काळेकर गेल्या काही दशकांत लालबाग, सांताक्रूझ, माहिम, गोरेगाव आणि बद्लापूर अशा मुंबईतील वेगवेगळ्या भागांत राहत होता. जुन्या चाळी पाडण्यात आल्याने त्याचा पत्ता शोधणे अधिक अवघड झाले होते. पोलिसांनी जुन्या मतदार यादी आणि शासकीय कागदपत्रांमधून त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील माहितीमुळे पोलिसांना एक ठोस दिशा मिळाली.

लायसन्सचे केले नूतनीकरण 

काळेकरने २०२३ साली आपले ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण केले होते. त्यावरील पत्ता आणि फोटो तपासून पोलिसांनी त्याचा ठाव लावला. त्यानंतर मोबाईलच्या IMEI नंबरच्या ट्रॅकिंगच्या माध्यमातून त्याचे अचूक लोकेशन शोधण्यात आले. पोलिसांनी त्याच्यावर गुप्त नजर ठेवून त्याला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दारराणी गावात पकडले आहे.

सोमवारी रात्री काळेकराला मुंबईत आणून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले असून, पुढील चौकशी सुरू आहे. पोलिस अजूनही त्या हल्ल्यातील पीडित महिलेचा शोध घेत आहेत. ४८ वर्षांनंतर मिळालेल्या या अटकेमुळे मुंबई पोलिसांनी एक जुनं प्रकरण यशस्वीरित्या हाताळल्याचं समाधान व्यक्त केलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून