मेक्सिकोमध्ये TikTok स्टारसह प्रियकराची हत्या, कपलवर झाडल्या 26 गोळ्या

Published : Apr 05, 2024, 09:03 AM ISTUpdated : Apr 05, 2024, 09:10 AM IST
muder girl 1

सार

मेक्सिको येथे पुएब्ला शहरात एका टिकटॉक स्टारसह तिच्या प्रियकराची हत्या करण्यात आली आहे. या कपलवर 26 गोळ्या झाडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Crime : मॅक्सिको शहरातील पुएब्ला (Puebla) शहरातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसह तिच्या प्रियकरावर जिम बाहेर गोळीबार करण्यात आला आहे. वेल्का पुलिडो (Veilka Pulido) असे टिकटॉक स्टारचे नाव आहे. वेल्का नेहमीप्रमाणे आपल्या प्रियकरासोबत जिममध्ये आली होती. यावेळी गाडीतून उतरत असताना वेल्का आणि तिच्या प्रियकरावर 26 राउंड फायरिंग करण्यात आली. ही घटना सीसीटिव्हीमध्येही कैद झाली आहे.

कारमधून आला होता हल्लेखोर
जिम बाहेर वेल्का आणि तिचा प्रियकर आपल्या कारमधून उतरत होते. याचवेळी एक राखाडी रंगातील कार वेल्काच्या कारजवळ येऊन उभी राहिली. गाडी थांबल्यानंतर ह्युंडईवर बसलेल्या एका व्यक्तीने वेल्काच्या गाडीवर गोळीबार केला. हल्लेखोराने कपलवर 26 राउंड फायरिंग केली. गोळीबारानंतर कपलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेचा पोलिसांकडून तपास
वेल्का आणि तिच्या प्रियकराच्या हत्येच्या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणात पोलिसांकडून वेल्काच्या प्रियकराबद्दलही अधिक माहिती मिळवली जात आहे. सध्या पोलिसांकडून सीसीटिव्ही फुटेज पाहून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातोय.

टिकटॉक स्टार वेल्काचे हजारोच्या संख्येने फॉलोअर्स
टिकटॉक स्टार वेल्का पुलिडोचे अ‍ॅपवर हजारो संख्येने फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवरही वेल्का प्रसिद्ध आहे. अशातच वेल्काची हत्या झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. काहींनी वेल्काच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : 

आईने फोन देण्यास नकार दिल्याने १२ वर्षाच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

Crime News : मित्रचं झाला वैरी ; ब्लो ड्रायरचे नोझल गुदाशयात टाकल्याने तरुणाचा मृत्यू

Double Murder in UP : उत्तर प्रदेशातील बदाऊ येथे दुहेरी हत्याकांड, दोन मुलांची गळा चिरुन हत्या

PREV

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून