सियाची पैशाची मस्ती एकदिवस नक्की उतरेल, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला दावा

Published : Jul 03, 2026, 11:59 PM IST
Sudhir Mungantiwar

सार

सिया आणि केतन प्रकरणात, सियाने माध्यमांना बोट दाखवून अश्लील वर्तन केले. यावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, पैशाच्या मस्तीमुळे आलेला हा अहंकार उतरेल असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे.

सिया आणि केतन यांचं प्रकरण अनेक दिवसांपासून सुरु आहे. या प्रकरणातील नवीन खुलासे समोर आले आहेत. आता सियाने माध्यमांना बोट दाखवलं होत. त्यावरून माध्यमांमधून चर्चा घडत असल्याचं दिसून आलं. यावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार? 

सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, लोहगड येथे झालेल्या प्रकरणाची आरोपीच अश्लील वर्तन आपण पाहिलेलं आहे. तिने माध्यमांना बोट दाखवलेला व्हिडीओ आपण सर्वानी पाहिला आहे. पोलीस बंदोबस्त असताना असं करायची हिंमत यांमध्ये कुठून येते हा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.

आरोपीला पैशाची मस्ती 

आरोपींना पैशाची मस्ती झालेली दिसून येते. रावणाचा अहंकार असतो. पैशाची मस्ती असेल तरी तिची मस्ती नक्की उतरेल. असं मस्ती करण्याचं काही कारण नाही. याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. आता सियाला किती शिक्षा काय होते याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Crime : मुंबई हादरली! तृतीयपंथी बनून घरात घुसला, महिलेवर अत्याचार करून पैसेही लुटले
Twisha Sharma : 20 लाख, जॉईंट अकाऊंट आणि तो एक कॉल... त्विशा शर्मा मृत्यूप्रकरणी खळबळजनक माहिती