
सिया गोयल आणि केतन अग्रवाल केसबद्दल रोज नवीन अपडेट समोर येत आहे. पोलिसांनी चेतन आणि सिया दोघांची ३ दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. यासाठी तपास यंत्रणेने पाच कारणे दिली होती. पण हि कारणे पोलीस कोठडी वाढवण्यासाठी पुरेशी नसल्याचं सांगण्यात आलं.
यापूर्वी आरोपींना १२ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यामुळं या कालावधीत तपास करता आला नाही हि पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. त्यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची रवानगी आता केंद्रीय कारागृहात केली जाणार आहे.
लाई डिटेक्टर चाचणीबाबतचा अर्ज न्यायालयात मांडला नाही. त्यामुळं त्या चाचणीची आवश्यकता नसल्याचे तपास यंत्रणेचे मत असल्याचं सांगण्यात आलं. न्यायालयाला पोलिसांनी दिलेलं कारण पटलं नाही. त्यामुळं बचाव पक्षाचं म्हणणं ऐकून घेऊन आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली. योग्य वेळी जामिनासाठी अर्ज करणार असल्याचं बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितलं.