पुण्यात युवासेना जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर गोळीबार, बुलेटमुळे फुटल्या काचा, नक्की काय घडले?

Published : May 20, 2025, 09:40 AM IST
Nilesh Ghare

सार

शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये राजेंद्र घारे यांच्या गाडीच्या काचा देखील फुटल्या गेल्या.

Pune Crime Firing : शहरात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या गाडीवर अज्ञात दुचाकीस्वारांनी थेट गोळीबार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही घटना वारजे माळवाडी परिसरात रविवारी रात्री सुमारे 12 वाजता घडली.

दुचाकीवरून आले आणि गोळी झाडली
 प्राथमिक माहितीनुसार, घारे यांची काळ्या रंगाची कार कार्यालयाबाहेर पार्क केलेली होती. ते गणपती माथा येथील जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांसोबत उपस्थित असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. गोळी थेट गाडीच्या काचेला लागून आत घुसली. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पोलिसांचा तपास सुरू 
घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, वारजे पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन तपास सुरू केला आहे. हल्लेखोर नेमके कोण होते, आणि त्यामागे उद्देश काय होता, याचा शोध घेण्यासाठी CCTV फूटेज तपासलं जात आहे.

राजकीय घडामोडींना वेग
या घटनेनंतर शहराच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट असून, अधिकाऱ्यांनी हल्लेखोरांना तातडीने पकडण्याची मागणी केली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून