सुनेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा, PM रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे; NCP नेता फरार

Published : May 19, 2025, 09:04 PM IST
rajendra hagawane daughter in law death

सार

मुळशीतील भुकूम येथे विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत.

पुणे: मुळशीतील भुकूम येथे विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. या घटनेनंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे फरार झाले आहेत, तर सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक खुलासे

डॉ. जयदेव ठाकरे आणि डॉ. एच.एस. ताटिया यांनी सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. अंतर्गत अवयव आणि इतर नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, विषप्रयोगाची शक्यताही तपासली जात आहे.

वैष्णवीच्या वडिलांची तक्रार

वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह २८ एप्रिल २०२३ रोजी झाला होता. लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी देण्यात आली होती. मात्र, लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक आणि त्याच्या कुटुंबीयांनी वैष्णवीचा छळ सुरू केला. ऑगस्ट २०२३ मध्ये गर्भवती असताना शशांकने चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली आणि घरातून हाकलून दिले. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी वैष्णवीने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारानंतर तिला सासरी पाठवले, पण छळ थांबला नाही.

शशांकने वैष्णवीच्या वडिलांकडे जमीन खरेदीसाठी २ कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न मिळाल्याने त्याने वैष्णवीला धमक्या दिल्या आणि मारहाण केली. मार्च २०२५ मध्ये सासू आणि नणंदेने वैष्णवीला मारहाण करून तिला माहेरी सोडले. १६ मे २०२५ रोजी शशांकने वैष्णवीने गळफास घेतल्याचे सांगितले. चेलाराम हॉस्पिटलमध्ये ती बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आणि गळ्यावर लालसर व्रण आढळले. शशांक आणि राजेंद्र यांनी "पैसे न दिल्याने वैष्णवीला मारले" असे सांगितल्याचा दावा कस्पटे यांनी केला आहे.

पोलिसांचा तपास

पोलिसांनी हगवणे कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सासू आणि नणंदेला अटक केली आहे. शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष गंभीर असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले की, "वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूमागे आत्महत्या की हत्या हे स्पष्ट करणे आमचे प्राधान्य आहे. आम्ही सर्व शक्यता लक्षात घेऊन फॉरेन्सिक तपास, घटनास्थळाचा बारकाईने आढावा, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स आणि साक्षीदारांचे जबाब यावर आधारित तपास करत आहोत. लवकरच सत्य समोर येईल."

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून