पुण्यात प्रेमाचा 'खेळ'! बावीस वर्षांच्या तरुणाने रचलं षडयंत्र, आधी शरीरसंबंध, मग बेस्ट फ्रेंडसोबतच बांधली लग्नगाठ

Published : May 02, 2025, 05:04 PM IST
relationship

सार

पुण्यात एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून मुंबईस्थित तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर तिच्या मैत्रिणीशी लग्न केले. गर्भपात झाल्यानंतरही त्याने विश्वासघात केल्याने तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पुण्यात एका तरुणाने केलेल्या विश्वासघाताची आणि फसवणुकीची धक्कादायक कहाणी समोर आली आहे. लग्नाचं खोटं स्वप्न दाखवून एका मुंबईस्थित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या कोल्हापूरच्या तरुणाचा पर्दाफाश झाला आहे. या तरुणाने केवळ तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत, तर ती गर्भवती झाल्यावर तिचा गर्भपातही घडवून आणला. पण कहाणी इथेच थांबत नाही, कारण यानंतर त्याने चक्क तिच्याच जिवलग मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केलं! या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ माजली आहे.

ओंकार उत्तम प्रधान (वय 22) असं या आरोपी तरुणाचं नाव आहे. फसवणूक झालेल्या पीडित तरुणीने कोडोली पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तत्काळ ओंकारला ताब्यात घेतलं आहे.

विश्वासाचा गळा घोटला!

या संदर्भात मिळालेली माहितीनुसार, नोकरीसाठी पुण्यात आलेल्या एका तरुणीची ओळख ओंकार प्रधान नावाच्या तरुणाशी झाली. ओंकारने तिला हळू हळू आपल्या बोलण्यात फसवून लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. काही दिवसांनंतर ओंकारने तिला अचानक सोडलं. पण खरी धक्कादायक बाब तर पुढे समोर आली, जेव्हा तिला कळलं की ओंकार तिच्याच मैत्रिणीसोबत पळून गेला आहे आणि दोघांनी लग्नही केलं आहे. हा प्रकार समजताच तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिने त्वरित पोलिसात धाव घेतली.

बारावीपर्यंत शिक्षण झालेला ओंकार प्रधान मूळचा कोल्हापूरचा आहे. तो नोकरीच्या शोधात पुण्यात आला आणि एका कंपनीत कामाला लागला. याच दरम्यान, सोशल मीडियावर त्याची ओळख मुंबईतील एका तरुणीशी झाली. त्यांची मैत्री कधी प्रेमात बदलली हे त्यांनाही कळलं नाही. ओंकार तिला भेटण्यासाठी अनेक ठिकाणी घेऊन गेला, ज्यात हडपसर आणि पन्हाळ्यासारख्या ठिकाणांचा समावेश आहे. प्रत्येक भेटीत त्याने तिला लग्नाचं स्वप्न दाखवलं आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

एवढंच नव्हे, तर लग्नापूर्वी ती गर्भवती राहिली, तेव्हा त्याने तिचा गर्भपात करण्यासही भाग पाडलं. इतकं सगळं झाल्यानंतरही ओंकारचं मन भरलं नाही. त्याने आपल्याच प्रेयसीच्या मैत्रिणीशी जवळीक साधली आणि काही दिवसांतच तिच्यासोबत पळून जाऊन लग्न केलं. जेव्हा या सगळ्या गोष्टींचा उलगडा पहिल्या प्रेयसीला झाला, तेव्हा तिने कोणतीही वेळ न दवडता कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन ओंकारला ताब्यात घेतलं असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे नात्यांमधील विश्वास आणि फसवणूक यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

US : STI च्या वादावरुन अमेरिकन विद्यार्थ्याकडून प्रेयसीवर चाकू हल्ला, हत्येप्रकरणी ठरला दोषी
गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून