बीडमध्ये पुन्हा रक्ताचं तांडव! दारूसाठी पुतण्यांनी केली काकूची निर्घृण हत्या, वाचा थरकाप उडवणारी कहाणी

Published : May 02, 2025, 03:20 PM IST
Crime News

सार

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात दोन पुतण्यांनी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून काकूची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. पैशांसाठी झालेल्या या हृदयद्रावक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

बीड जिल्हा सध्या गुन्हेगारीच्या दृष्टीनं संवेदनशील बनला आहे. मस्साजोगचे लोकप्रिय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता, आणि या घटनेची धग अजून विझलेली नाही तोच, बीडमधून आणखी एका भीषण हत्येची बातमी समोर आली आहे.

परळी तालुक्यात दोन सख्ख्या पुतण्यांनी आपल्या काकूची अत्यंत निर्दयपणे हत्या केली आहे. त्यांनी धारदार कुऱ्हाडीने वार करत काकूचा जीव घेतला, आणि या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिरसाळा पोलीस ठाण्यात या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. चंद्रकांत कावळे आणि धुराजी कावळे अशी या आरोपींची नावं आहेत.

पैशांसाठी हैवानियत!

या धक्कादायक प्रकरणाची माहिती अशी आहे की, आरोपी चंद्रकांत कावळे आणि धुराजी कावळे हे दोघेही दारूच्या आहारी गेलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी या नराधमांनी आपल्या काकूकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, काकूंनी त्यांना पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. या क्षुल्लक कारणावरून या दोघांनी काकूंशी वाद सुरू केला. बघता बघता वाद इतका विकोपाला गेला की, एका पुतण्याने क्रूरतेची सीमा ओलांडली आणि हातात असलेल्या कुऱ्हाडीने काकूच्या डोक्यात सपासप वार केले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

फक्त दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका पुतण्याने आपल्या काकूची अशा प्रकारे हत्या केल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. परिमळाबाई कावळे असं दुर्दैवी महिलेचं नाव आहे. शिरसाळा पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करत आरोपी चंद्रकांत कावळे आणि धुराजी कावळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलीस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. या हृदयद्रावक घटनेचा पुढील तपास पोलीस कसून करत आहेत.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून