Mumbai Cyber Crime | डिजिटल अरेस्ट रॅकेटमध्ये 6 अटक: मुंबई सायबर | Digital Arrest | Cyber Fraud

Mumbai Cyber Crime | डिजिटल अरेस्ट रॅकेटमध्ये 6 अटक: मुंबई सायबर | Digital Arrest | Cyber Fraud

Published : Sep 17, 2026, 09:06 PM IST

मुंबई क्राइम ब्रँचच्या सायबर विभागाने डिजिटल अरेस्ट आणि इन्व्हेस्टमेंट फ्रॉडशी संबंधित तीन प्रकरणांची माहिती दिली. नॉर्थ सायबर पोलीस ठाण्यात ऑगस्टमध्ये दाखल झालेल्या सुमारे 1 कोटी 12 लाख रुपयांच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पीडित व्यक्ती 68 वर्षांची ज्येष्ठ नागरिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात म्यूल अकाउंट, त्यासाठी कागदपत्रे देणे, OTP ट्रान्सफरसाठी हँडसेट आणि सिमकार्ड पुरवणे तसेच संपूर्ण गटाचे समन्वय करण्यामध्ये आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका बँकेचा रिजनल मॅनेजर आणि IIT दिल्लीमधून पदवी घेतलेला वेब डेव्हलपर असल्याची माहिती देण्यात आली. बँकेला अकाउंट होल्ड किंवा फ्रीज करण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या नोटिसची माहिती आरोपींपर्यंत पोहोचवल्याचा आरोप संबंधित बँक अधिकाऱ्यावर आहे. या प्रकरणात सुरुवातीला सुमारे 12.5 लाख रुपये होल्ड करण्यात आले आणि आतापर्यंत 11 लाख रुपयांची रिकव्हरी करण्यात आली आहे. दुसऱ्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉड प्रकरणात दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील तीन ठिकाणी छापे टाकून तीन आरोपींना अटक करण्यात आली. एका आरोपीकडून 100 मोबाइल हँडसेट, त्यापैकी 91 कीपॅड फोन, 669 सिमकार्ड, कॉम्प्युटर, CPU, चार्जर्स, मोबाइल बॅटरी, चेकबुक आणि पासबुक जप्त करण्यात आले. या प्रकरणात विदेशातील काही IP आढळल्याने त्याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिसऱ्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडमध्ये ज्येष्ठ नागरिकाला मोठ्या नफ्याचे आमिष आणि बनावट ग्राफ दाखवून सुमारे 1 कोटी 89 लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात सातारा, पुणे आणि पनवेल-कळंबोली येथून चार आरोपींना अटक करण्यात आली. सुमारे 27 लाख रुपये होल्ड करण्यात आले असून जवळपास 10 लाख रुपयांची रिकव्हरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबई पोलिसांनी नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अस्तित्वात नसल्याचे सांगत अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नये आणि फसवणूक झाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा 1930 वर कॉल करावा, असे आवाहन केले.

15:59विशाल अग्रवालांची मागणी, केतनला फास्ट ट्रॅकमध्ये न्याय द्या | KetanAgarwal | SiyaGoyal | PuneCase
03:25FDA Raid| सियाच्या वडिलांचे दुकान बंद |आम्हाला त्रास होतोय, फाशी दोषीला द्या | Ketan agarwal case
03:45Pune Ketan Case । Siya प्रकरणात Vipul Dushing यांनी मांडली बाजू | Hearing | Court
06:27Nasrapur निकालावर Ajay Misar यांची प्रतिक्रिया | POCSO | Verdict | Capital Punishment
03:13Pune Ketan Case ।केतन अग्रवाल प्रकरणात लोहगडवर घटनाक्रमाची पुनर्रचना | Lohagad Fort | Sia Goyal
05:28Pune Ketan Case । केतन अग्रवालला श्रद्धांजली देण्यासाठी शांतता मोर्चा
04:07Pune Ketan Case । उज्ज्वल निकमांची केतन प्रकरणात नियुक्ती; फडणवीसांचा फोन
02:57Pune Ketan Lohagad l पाहा सुरक्षा रक्षकाने नेमकं काय पाहिलं
07:20Pune Ketan Case । सियाचे वडाील म्हणाले, तर मुलीला ही शिक्षा द्या | Lohagad Fort Case | Siya Goyal