Pune Crime: रक्षाबंधनाला भाऊ आला तर तुला मारून टाकू, धमकीनंतर विवाहितेने राहत्या घरी केली आत्महत्या

Published : Aug 11, 2025, 11:48 AM IST
sucide

सार

पुण्यात रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाताने आल्यास जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर एका विवाहितेने आत्महत्या केली. तिच्या सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आहे. 

पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील आत्महत्याच्या आठवणी अजूनही ताज्या असताना एक दुर्घटना घडली आहे. रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाताने आला तर जीवे मारुन टाकू, अशी धमकी नवऱ्याने विवाहितेला दिली होती. त्यानंतर या विवाहितेने आत्महत्या केली आहे. यानंतर विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली असून महिलेचे नाव स्नेहा विशाल झेंडे आहे.

सासरच्या मंडळींच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल 

स्नेहा ही आंबेगाव बुद्रुक येथे राहायला होती. तिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी स्नेहा झेंडगे हिचा नवरा विशाल, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे आणि दीर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे, नणंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

स्नेहाचे वडील काय म्हणाले?  

पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात स्नेहाने आत्महत्या केली आहे. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्नेहाचे वडील कैलास यांनी सांगितलं आहे की, आम्ही झेंडगे कुटुंबीयांच्या मागणीप्रमाणे मुलीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर काही महिने झेंडगे कुटुंबीय मोहोळला राहत होते, नंतर ते पुण्यात राहायला आले. आम्ही स्नेहाचा नवरा विशाल याच्या मागणीप्रमाणे शेतजमीन घेण्यासाठी त्यांना पाच लाख रुपये दिले. झेंडगे कुटुंबीय पुण्यात कुठे राहायला आले आहेत, हे त्यांनी आम्हाला सांगितले नव्हते. झेंडगे यांची वेळू येथे कंपनी आहे. स्नेहाचे भाऊ कंपनीत गेले होते, त्यावेळी त्यांना हाकलून देण्यात आले.

लग्न झाल्यानंतर स्वयंपाक येत नसल्यामुळे दिला त्रास स्नेहा आणि विशाल या दोघांचे लग्न मागील वर्षी झाले होते. लग्नानंतर आयुष्य काही दिवस सुरळीत चालले होते पण नंतर भांडणाला सुरुवात झाली. स्नेहल स्वयंपाक येत नव्हता म्हणून तिला त्रास द्यायला सुरुवात झाली. त्यानंतर पती आणि कुटुंबाने माहेरकडून २० लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करण्यात आली. पैसे मिळवण्यासाठी केवळ मानसिक छळच नव्हे तर मारहाण, शिवीगाळ अशा प्रकारची वागणूक दिली जात होती. या सगळ्याला कंटाळून स्नेहाने यापूर्वी पोलिसांत एक गुन्हा दाखल केला होता. त्रासाला कंटाळून 9 ऑगस्ट 2025 रोजी घरात कोणी नसताना स्नेहाने गळफास घेऊन जीवन संपवले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Crime News : गर्भवती मुलीला बापानेच जीवे मारले; हुबळीत ऑनर किलिंग
हॉटेलच्या रुमचा नंबर चुकली अन् विवाहितेवर सामूहिक बलात्कार, छ. संभाजीनगरात हे काय घडतंय!