
अकोला: सध्याच्या काळात धक्कादायक घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललं आहे. अकोल्यातील पारस येथे एका विवाहित व्यक्तीनं आत्महत्या केली असून त्यानं एक व्हिडीओ बनवला आहे. त्याने या व्हिडिओमध्ये बायकोसह, सासरच्या लोकांनी आपला छळ केला असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं त्यानं आत्महत्येसारखा टोकाचं पाऊल उचललं असून हा व्हिडीओ पोलिसांना मिळाला आहे.
संघपाल खंडारे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीच नाव असून तो ऑटोरिक्षा चालवण्याचं काम करत होता. त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने सासरच्या ६ ते ७ लोकांनी आपल्याला मारहाण केली होती असं म्हटलं आहे. व्हिडीओ बनवल्यानंतर त्यानं त्यामध्ये ज्या लोकांनी त्याला त्रास दिला होता त्यांची नाव घेतली आहेत.
संघपाल याने व्हिडीओ काढल्यानंतर तो सर्व नातेवाईकांना पाठवला आहे. सासरच्या लोकांनी आपल्याला कर्ज काढायला सांगितलं होत. सासरच्या लोकांपासून आपल्या जीविताला धोका होता. व्हिडिओमधून त्यानं आपल्या जीविताला धोका असलेल्या व्यक्तींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी संघपालच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केली आहे. तसेच 4 जणांना अटक केली आहे. यामध्ये पत्नी, सासूसह 3 महिला आणि एका पुरुषाचा अटकेत समावेश आहे. या व्हिडिओमध्ये त्याने सासरच्या लोकांनी आपल्याला कसा त्रास दिला याबद्दलची माहिती दिली आहे.
व्हिडिओमध्ये बोलताना संघपाल म्हणतो की, दादा मी काय म्हणतो ते कान देऊन ऐक, त्याची आणि त्याच्या पत्नीची भांडणं झाली. त्यानंतर तिचा चुलत भाऊ, सख्खा भाऊ त्यांचे मित्र अशी मिळून चार ते पाच जणांनी मला बेदम मारलं, आणि मला आठ दिवसांपूर्वू त्यांनी तीन लाख रूपये कर्ज काढायला लावलं, ते मला जगू देत नाहीयेत. मला ते धमक्या देत आहेत. बायको, तिचा भाऊ, तिची आई, तिची बहिण, तिच्या भावाचे मित्र असे सहा ते सात जण आहेत. ते मला मारून टाकतील, त्याआधी मी माझा जीव देतो, मी मेल्यावर त्यांना सोडू नको. हा व्हिडीओ तू पोलिसांना दाखव आणि तिच्यावर केस कर, कसंही कर, जातो दादा, आई आणि बाबाला तू सांग, बाय बाय असं संघपाल याने शेवटच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.